डोनाल्ड ट्रम्प पाक सैन्यप्रमुख असीम मुनीरसोबत घेणार लंच; हिंदुस्थानला डिवचण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. दुपारी होणाऱ्या मेजवानीदरम्यान ही भेट होणार असून इस्रायल आणि इराण दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतंच इराणला बिनशर्त माघार घेण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे जनरल आसीम मुनीर यांनी वॉशिंग्टनमध्येच इराणला समर्थन जाहीर केले आहे. तसेच जागतिक शांततेचं आवाहान केलं आहे.
जनरनल मुनीर जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणारे अनिवासी पाकिस्तानी आणि पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या समर्थकांनी निदर्शनं केली. त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून, पाकिस्तानचेच लोक मुनीरला पाकिस्तानींचा खुनी आणि इस्लामाबादचा मारेकरी अशा घोषणा देताना दिसत आहेत.
द अलायन्स ऑर्गनायजेशनच्या नाजिया इम्तियाज हुसैन यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आम्ही पाकिस्तानच्या हुकुमशाह विरोधात आंदोलन करत असल्याचे सांगितले. तसेच जनरल मुनीर फॅसिजमच्या समर्थनार्थ इथे आले असून त्याची आम्हाला लाज वाटते. त्यांनी फक्त लोकशाहीलाच धोका नाही दिला तर सामान्य माणसांनाही संकटात टाकलं असेही नाजिया यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि इराणच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतियश महत्त्वाची आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल या सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले आहे की आमचे संपूर्ण इराणवर लक्ष आहे. सुप्रीम लीडर कुठे लपला आहे याची आम्हाला पुर्ण कल्पना आहे. पण सध्या आम्ही त्याला मारणार नाही. आमची सहनशक्ती उत्तर देत आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तर जनरल मुनीर यांनी एका भाषणादरम्यान इराणला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच या संकटातून काही शांततापूर्वक मार्ग निघेल अशी आशा व्यक्त केली आहे.
इराण आणि इस्रायलदरम्यान गेल्या काही दिवसांत हिंसक हल्ले सुरू झाले आहेत. इस्रायलने इराणच्या अण्वस्त्रांच्या ठिकाणी हल्ले केले होते. आता इराणनेही इस्रायलवर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले आहेत त्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Comments are closed.