PAK vs SL: पाकिस्तानने श्रीलंकेवर 5 धावांनी रोमांचक विजय मिळवून फायनल गाठला

आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 च्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान ए आणि श्रीलंका ए आमनेसामने आले. सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. पाकिस्तानने शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक सामना देत श्रीलंकेवर 5 धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीसाठी आपला मार्ग ठरवला.

पाकिस्तानने बांगलादेशसमोर 154 धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेनेही या धावांचा अखेरपर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीलंकेचे प्रयत्न 5 धावांनी कमी पडले. पाकिस्तानने श्रीलंकेला शेवटच्या चेंडूवर दहावा आणि शेवटचा झटका दिला आणि ऑलआऊट केलं. श्रीलंकेचा डाव अशाप्रकारे 148 धावांवर आटोपला परिणामी पाकिस्तानचा 5 धावाने विजय झाला.

यापूर्वी उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारतावर मात करून फायनलमध्ये प्रवेश केला. भारत आणि बांगलादेशचा सामना टाय झाला होता, त्यानंतर बांगलादेशने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

आता 23 नोव्हेंबर रोजी आशिया कप ट्रॉफीसाठी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना निर्णायक ठरणार आहे. बांगलादेशने भारतावर विजय मिळवल्यामुळे आणि पाकिस्तानने श्रीलंकेवर दमदार विजय मिळवल्यामुळे फायनलमध्ये उत्साह आणि अपेक्षा दोन्ही पटींनी वाढल्या आहेत. सामना कोण जिंकणार, हे चाहत्यांसाठी मोठा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

Comments are closed.