6 चेंडूत 6 सिक्स, 12 चेंडूत 67 धावा ठोकल्या अन् सामना जिंकला… पाकिस्तानची तुफान फटकेबाजी


पाकिस्तान विरुद्ध कुवेत हाँगकाँग षटकार 2025 : हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेला धडाकेबाज सुरुवात झाली आहे. पावसामुळे पहिल्या दोन सामने बांगलादेश विरुद्ध हॉंगकाँग आणि यूएई विरुद्ध इंग्लंड रद्द झाले, मात्र तिसऱ्याच सामन्यात पाकिस्तानने कुवेतविरुद्ध तुफानी (Pakistan vs Kuwait) फटकेबाजी करत धमाका केला. कुवेतने प्रथम फलंदाजी करत केवळ 6 षटकांत 2 गडी गमावून तब्बल 123 धावा केल्या. प्रत्युत्तर पाकिस्तानने अखेरच्या चेंडूवर लक्ष्य गाठत रोमांचक विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तानचा स्टार ठरला अब्बास आफ्रिदी(Abbas Afridi). ज्याने फक्त 12 चेंडूत 55 धावा ठोकल्या. त्याने एका षटकात सलग 6 षटकार मारून एकट्याने 38 धावा काढल्या.

6 चेंडूत 6 सिक्स, 12 चेंडूत 67 धावा ठोकल्या…

एक वेळ अशी आली होती की, पाकिस्तानचा स्कोअर 4 षटकांत फक्त 57 धावांवर होता आणि विजय जवळजवळ अशक्य दिसत होता. संघाला शेवटच्या 12 चेंडूत तब्बल 67 धावांची गरज होती. पण मग कर्णधार अब्दुल अब्बास आफ्रिदी मैदानात आला आणि सामन्याचे चित्रच बदलले. त्याने पाचव्या षटकात सलग 6 षटकार लगावून एकूण 38 धावा केल्या, तर शेवटच्या षटकात आणखी 29 धावा ठोकत पाकिस्तानला विजय मिळाला. त्या षटकातही त्याने 4 षटकार आणि एक चौकार फटकावला.

कुवेतकडून मीत भावसारने 14 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या, तर उस्मान पटेलने 9 चेंडूत 31 धावांची चमकदार खेळी केली. पाकिस्तानकडून सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती, ख्वाजा नफेने 11 चेंडूत 25 धावा केल्या, तर मोहम्मद शहजादने 8 चेंडूत 14 धावा केल्या पण तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. अब्दुल समद शून्यावर बाद झाला. पण, अब्बास आफ्रिदीच्या विस्फोटक खेळीमुळे पाकिस्तानने अशक्य वाटणारा पाठलाग करत स्पर्धेतील आपला पहिला सामना गाजवला.

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि किती वाजता? (IND vs PAK Live Hong Kong Sixes 2025)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 7 नोव्हेंबरला दुपारी 1:05 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल. टीम इंडिया आपला पुढील सामना 8 नोव्हेंबरला सकाळी 6:40 वाजता कुवेतविरुद्ध खेळेल. प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांना क्वार्टर फायनल फेरीत प्रवेश मिळेल, त्यानंतर नॉकआउट फेरी सुरू होईल.

हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत गट

पूल A: दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, नेपाळ
पूल B: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, यूएई
क गट: भारत, पाकिस्तान, कुवेत
D पूल: श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग

हे ही वाचा –

Mumbai Squad for Ranji Trophy : मुंबई संघात मोठा फेरबदल! यशस्वी जैस्वाल बाहेर, नेमकं काय घडलं? आयुष म्हात्रेला मिळाली एन्ट्री

आणखी वाचा

Comments are closed.