IND vs PAK T20 WORLD CUP : पाकिस्तानचा खोडसाळपणा, हँडशेक वादाला पुन्हा हवा, वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला आव्हान!

पहलगाम हल्ल्यानंतर टीम इंडियाचे पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत जेवढे सामने झाले त्यात टीम इंडियाच्या कर्णधाराने कधीच पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन केले नाही. टीम इंडियाने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्याासाठी घेतलेल्या या निर्णयाची जगभरातील क्रिडा वर्तुळात चर्चा झाली. दरम्यान लवकरच आता टी-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा एकदा खोडसाळपणा करत हॅंडशेक वादाला हवा दिली आहे.
“हँडशेक चुकल्यासारखं वाटतंय, तुम्ही चालल्यावरही थांबलात.”
पीसीबीने ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याच्या प्रोमोमध्ये भारताला पूर्णपणे शिजवले 😂🔥
तो काहीसा आशय आहे 👌pic.twitter.com/SaQWmCHVkG
— जुनैझ (@dhillow_) 21 जानेवारी 2026
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत हिंदुस्थान–पाकिस्तानमधील नो-हॅंडशेक वादावर टिप्पणी केली आहे. पाकिस्तानकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत एक ऑस्ट्रेलियन चाहता टॅक्सी चालकासोबत संवाद साधताना दिसतो. तो निघताना असताना चालक त्याला उर्दूमध्ये थांबवतो आणि म्हणतो, “हँडशेक करायला विसरलात वाटतं… शेजाऱ्यांकडे देखील थांबला होतात वाटतं!”
नेमका ‘नो-हॅंडशेक’ वाद काय आहे?
२०२५ साली जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, आशिया चषकातील टीम इंडिया–पाकिस्तान सामन्याच्या वेळी टॉस व सामना संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव व इतर खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हॅंडशेक करण्यास नकार दिला होता.याबाबत माध्यमांशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला होता की, हा निर्णय पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांप्रती तसेच सशस्त्र दलांप्रती आदर आणि श्रद्धांजली म्हणून घेतला होता.

Comments are closed.