पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना सुरु असताना स्टेडियममध्ये अचानक स्फोट, एकाचा मृत्यू, काळजाचा थरकाप
पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण बॉम्बस्फोट (Bomb Blash in Cricket Match) झाला असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी वृत्तसंस्था डॉनने दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट नियोजनपूर्वक घडवून आणण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मैदानात अचानक झालेल्या स्फोटामुळे चारही बाजूला धुराचे लोट पसरले आणि मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
हा स्फोट बाजौर जिल्ह्यातील खार तहसील येथील कौसर क्रिकेट ग्राऊंडमध्ये झाला. धमाक्यानंतर खेळाडू व उपस्थित लोक जीव वाचवण्यासाठी पळापळ करताना दिसले. केवळ आठवडाभरापूर्वी याच प्रांतातील एका पोलीस ठाण्यावर क्वाडकॉप्टरच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला होता, ज्यात एका हवालदारासह एका नागरिकाला दुखापत झाली होती.
खावरिजचा हा धोका आहे! कौशर ग्राउंड, खार, बाजौर येथे, क्रिकेट सामन्यादरम्यान एक बॉम्ब स्फोट झाला आणि निर्दोष नागरिकांना लक्ष्य केले. हे निर्दोष लोक, जे निर्दोष लोकांच्या रक्ताने खेळतात, ते इस्लाम आणि मानवतेचे महान शत्रू आहेत.#नोटोटेरिझम #Bajaur #Pacistan pic.twitter.com/cnnawixmvt
– ईगल पंजा (@egleclawstrike) 6 सप्टेंबर, 2025
बाजौर जिल्ह्याचे पोलीस अधिकारी वकास रफीक यांनी डॉनला दिलेल्या माहितीत सांगितले की, हा स्फोट पूर्वनियोजित होता आणि स्फोटकांच्या साहाय्याने घडवून आणण्यात आला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून काही मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरला. अद्यापपर्यंत या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.