भारताच्या विजयाने पाकिस्तानमध्ये निराशा, शाहिद आफ्रिदींची प्रतिक्रिया चर्चेत!

रविवारी भारतात दिवाळीसारखा उत्सव साजरा झाला, कारण भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy 2025) फायनल जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने सलग दुसऱ्या वर्षी आयसीसीचे विजेतेपद जिंकले आहे, जे यापूर्वी कधीही घडले नव्हते. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने 252 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे रोहित शर्माच्या शानदार सुरुवातीमुळे सोपे झाले. भारताने अंतिम सामना 4 विकेट्सने जिंकला. शेजारील देश पाकिस्तानमधील काही लोक अजूनही तेच जुने राग बाळगत आहेत. अंतिम सामन्यानंतर शाहिद आफ्रिदी म्हणाले की भारतीय संघ जिंकला नसता तर मला आश्चर्य वाटले असते .

समा टीव्हीशी बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाले की, भारत ज्या पद्धतीने या मैदानावर खेळत होता. भारतीय संघाला स्पर्धेदरम्यान प्रवास करावा लागला नाही, त्याने या मैदानावर सातत्याने खेळ केला आणि अर्थातच तो जिंकणार होता. भारतीय संघ जिंकला नसता तर मला आश्चर्य वाटले असते. अँकर पुढे विचारू लागला की या मैदानावर खेळल्यामुळे भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले का?

शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा मैदानावर खेळण्याचे फायदे सांगितले. नंतर ते म्हणाले की हे सुरुवातीलाच ठरेल होतं आता या वरती अजून की बोलणार. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन करताना आफ्रिदी म्हणाले, “भारतीय संघाला माहित होते की स्पिनर्स त्यांना दुबईमध्ये मदत करतील, म्हणून त्यांनी त्यानुसार एक चांगला संघ बनवला.”

शाहिद आफ्रिदीनेही पाकिस्तानची खिल्ली उडवली. ते म्हणाले, “पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 4 फिरकीपटू खेळवायचे होते, ते तिथे त्यांनी खेळवले नाही. आता ते न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 4 फिरकीपटू घेत आहेत जिथे त्यांची गरज नाही.” याबद्दल बोलताना आफ्रिदीला हसू आवरता आले नाही.

महत्वाच्या बातम्या :

क्रिकेटर की डान्सर? श्रेयस अय्यरच्या भन्नाट स्टेप्सवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस!

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे भाग्य! – विराट कोहलीची भावनिक प्रतिक्रिया

क्रिकेटचा सोनेरी क्षण! या 7 भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला!

Comments are closed.