पाकिस्तानला मसूद अझहर कुठे आहे, हे मला माहित नाही, दहशतवादी प्रेमी बिलावल भुट्टो यांचं वक्तव्य

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झर्डी

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याच्या ठावठिकाण्याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे. अल जझीरा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, पाकिस्तान सरकारला मसूद अझहर कुठे आहे याची माहिती नाही. मात्र तो कदाचित अफगाणिस्तानात असावा, असं ते म्हणाले आहेत.

बिलावल भुट्टो यांनी यावेळी दहशतवादी हाफिज सईद याच्याबाबतही भाष्य केले. हाफिज सईद हा मोकळा फिरत असल्याचा दावा खोटा असून तो पाकिस्तान सरकारच्या ताब्यात आहे, असे त्यांनी सांगितले. मसूद अझहरच्या बाबतीत त्यांनी म्हटले की, जर हिंदुस्थानने त्याच्या पाकिस्तानातील उपस्थितीबाबत ठोस माहिती दिली, तर पाकिस्तान त्याला अटक करण्यास तयार आहे.

दरम्यान, मसूद अझहर हा संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला जागतिक दहशतवादी आहे आणि त्याच्यावर 2001 च्या हिंदुस्थानी संसदेवरील हल्ला, 2008 च्या मुंबई हल्ला आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यासह अनेक दहशतवादी कारवायांचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे.

Comments are closed.