आशिया कपसाठी पाकिस्तानचा बलाढ्य संघ; बाबर, रिझवानला आशिया कप संघातून नारळ
स्पर्धा कोणतीही असो, नेहमीच हिंदुस्थानला हरवण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने आगामी आशिया कपसाठी आपला 17 सदस्यीय बलाढय़ संघ जाहीर केला आहे. त्यांनी संघाला बलशाली बनवताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या स्टार फलंदाजांना नारळ देण्याचे धाडस दाखवले आहे. या वेगवान क्रिकेटसाठी त्यांनी सलमान आगाकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.
आशिया चषक टी-20 स्पर्धेत पाकिस्तानला ‘अ’ गटात हिंदुस्थान, ओमान आणि यूएई यांच्यासह स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तान आपला मोहिमेचा पहिला सामना 12 सप्टेंबरला ओमानविरुद्ध खेळेल, तर 14 सप्टेंबरला हिंदुस्थानविरुद्धचा बहुचर्चित सामना रंगणार आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामन्यात 202 धावांनी पराभवाची नामुष्की पत्करावी लागलेल्या पाकिस्तानी संघाला आशिया चषक स्पर्धेसाठी सज्ज होण्याचे आव्हान असेल. आशिया चषकापूर्वी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान शारजाह क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि यूएई यांच्यात तिरंगी टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
बाबर आणि रिझवानला वगळण्यात आले असले तरी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रऊफ तसेच अनुभवी फलंदाज फखर झमान आणि खुशदिल शाह यांचा संघात समावेश आहे. तारेवरची कसर करणारा यष्टिरक्षक मोहम्मद हारिसलाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर हसन नवाज, सलमान मिर्झा आणि सुफियान मकीम यांसारख्या तरुण खेळाडूंवर निवड समितीने विश्वास दाखवला आहे.
पाकिस्तान आशीया चॅशकासती असोसिएशन: सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जामन, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाझ, हुसेन तालत, खुझदील शाह, मोहम्मद, मोहमाद, मोहमादा. साहिबजादा फरहान, सियम अयुबी, सियम अयुब सूफियान मकिम.
Comments are closed.