हा संघ आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल खेळणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत मोठे विधान केले आहे. आफ्रिदीने पाकिस्तानला स्पर्धेचा फायनलिस्ट म्हटले. त्याने संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज आणि कर्णधार मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. शाहिद आफ्रिदीने मोहम्मद रिझवानबद्दल एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला की, “मोहम्मद रिझवान हा एक उत्तम कर्णधार आहे. तो संघाला योग्य दिशेने घेऊन जात आहे. त्याच्याकडे युवा आणि वरिष्ठ खेळाडूंचे चांगले संयोजन आहे. मला खात्री आहे की त्याच्या नेतृत्वाखाली कर्णधारपदामुळे पाकिस्तान 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नक्कीच पोहोचेल.”

मोहम्मद रिझवानने अलिकडेच कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने विजयी लय राखली आहे. फलंदाजी आणि विकेटकीपिंगसोबतच त्याने कर्णधारपदातही आपली शैली दाखवली आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाला की, सध्याच्या पाकिस्तान संघात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची पूर्ण ताकद आहे. त्यांने बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि नसीम शाह या संघातील काही महत्त्वाच्या खेळाडूंचाही उल्लेख केला.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 8 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी परतली आहे. आगामी स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केले जाणार आहे. यजमान देश आणि गतविजेता म्हणून, पाकिस्तान त्यांचे जेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. जगातील 8 सर्वोत्तम संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ तीन गट-टप्प्याचे सामने खेळेल. ज्यामध्ये प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याची तिकिटे चक्क इतक्या रुपयांत, पीसीबीकडून रेट कार्ड जाहीर
ड्रेसिंग रुममधील चॅट लिक करणाऱ्या खेळाडूचे नाव समोर, हेड कोचचा गंभीर आरोप!
विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला हा संघ, माजी आरसीबीच्या खेळाडूची शानदार खेळी

Comments are closed.