पाकिस्तानला भारतीय क्षेपणास्त्रांची भीती वाटते

ऑपरेशन सिंदूरच्या धास्ती :  छोटे-छोटे दहशतवादी तळ निर्माण करतोय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत सैन्याच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधता सातत्याने कठोर कारवाई करत आहे. परंतु दुसरीकडे पाकिस्तान स्वत:ची आगळीक सुरूच ठेवून आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालातून पाकिस्तान 90 दिवसांच्या आत ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झालेल्या 15 दहशतवादी तळांना आणि लाँचपॅड्सना पुन्हा निर्माण करत असल्याचे समोर आले आहे. दहशतवादाची ही नवी रणनीति भारतासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबविले होते. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डयांना लक्ष्य केले होते, ज्यात जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांचे तळ होते. भारताच्या या कारवाईत सुमारे 100 दहशतवादी मारले गेले होते. बहावलपूर येथील जैशचे मुख्यालय आणि मुरिदके येथील लष्कर-ए-तोयबाच्या अ•dयांनाही उद्ध्वस्त करण्यात आले होते. परंतु पाकिस्तान आता या अड्डयांना पुन्हा निर्माण करत असल्याचे समोर आले आहे.

15 नव्या दहशतवादी अड्डयांची निर्मिती

गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार मागील तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 15 नवे दहशतवादी अ•s आणि लाँचपॅड्स तयार करण्यास सुरुवतत केली आहे. हे अड्डयांखालील ठिकाणी आहेत…

-केल, शारदी, दुदनियाल,  अथमुकाम, जुरा, लिपा व्हॅली, तंदापानी, नय्याली, जांकोट आणि चकोठी

-याचबरोबर जम्मू क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेच्या पार मसूर, चपरार आणि शाकर्गढमध्ये एक ड्रोन सेंटर पुन्हा सुरू होतेय.

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि पाक सरकारचे अन्य विभाग या दहशतवाद्यांना पूर्ण रसद पुरवत आहेत. आयएसआयने या दहशतवादी अड्डयांसाठी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पुरविली आहे.

पाकिस्तानची नवी रणनीति

पाकिस्तान आता यापूर्वीच्या चुकांमधून धडे घेत नवी रणनीति वापरत आहे.

छोटे कॅम्प : पूर्वी एका कॅम्पमध्ये 100-15 दहशतवादी असायचे, परंतु आता प्रत्येक कॅम्पमध्ये केवळ 20-25 दहशतवादी ठेवले जात आहेत, जेणेकरून भारतीय सैन्याच्या मोठ्या हल्ल्यापासून वाचता येईल.

जंगलात दडलेले कॅम्प : हे दहशतवादी कॅम्प घनदाट जंगलांमध्ये निर्माण केले जात आहेत, जेणेकरून भारतीय टेहळणीला चकवा दिला जाऊ शकेल.

तंत्रज्ञानाचा वापर : ड्रोन, रडार कॅमोफ्लाज आणि सॅटेलाइट मास्किंग यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय.

महिला अन् मुले : दहशतवादी आता स्वत:च्या कॅम्पमध्ये महिला आणि मुलांना ढालीच्या स्वरुपात ठेवत आहेत.

नवे प्रशिक्षण : दहशतवाद्यांना आता ड्रोन आणि हेरगिरीच्या उपकरणांचे प्रशिक्षण दिले जातेय.

आयएसआय अन् दहशतवादी संघटनांचा कट

ऑपरेशन सिंदूरनंतर आयएसआयने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि द रेसिस्टेंस प्रंटच्या म्होरक्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत.

-नवी शस्त्रास्त्र खरेदी करण्यात येत आहेत.

-ऑपरेशनल लीडरशिपला पुन्हा संघटित केले जातेय.

-पाकिस्तान, काश्मीरमध्ये नव्या दहशतवाद्यांच्या भरतीचा प्रयत्न

परंतु जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या कठोर कारवाईमुळे नवी भरती अत्यंत कमी झाली आहे. स्थानिक लोक देखील आता दहशतवाद्यांसोबत जोडले जाण्यास टाळाटाळ करत आहेत.

भारतासाठी धोका का?

नव्याने हल्ल्याची भीती : हे कॅम्प पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरी आणि हल्ल्याची योजना आखू शकतात.

तांत्रिक आव्हान : ड्रोन आणि रडार कॅमोफ्लाजमुळे भारतीय सैन्याला टेहळणीस अडथळा होऊ शकतो.

Comments are closed.