Israel Iran War – चीनमध्ये ठरणार आखातातील युद्धाची दिशा? पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा चीन दौऱ्याने चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध आता महिन्याभरापासून सुरू आहे. या युद्ध समाप्तीसाठी इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तर इराणने या दाव्याचा साफ इन्कार केला आहे. तसेच या दोन देशांमध्ये पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याचीही चर्चा आहे. मात्र, युद्ध समाप्तीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. त्यातच आता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार मंगळवारी चीनच्या दौऱ्यावर जात असल्याने चर्चा सुरू आहेत.

अमेरिका-इराण संवादासाठी पुढाकार घेत असतानाच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार मंगळवारी चर्चेसाठी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार आपल्या चिनी समकक्षांशी चर्चा करण्यासाठी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

अमेराक-इराक युद्धादरम्यान या दौऱ्याला महत्त्व आले आहे. त्यामुळे हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अमेरिका आणि इराण यांना इस्लामाबादमध्ये थेट चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि इजिप्त यांच्या साथीने सुरू असलेल्या एका चतुष्पक्षीय राजनैतिक मोहिमेच्या केंद्रस्थानी दार यांनी गेल्या आठवड्यात सक्रिय सहभाग घेतल्याची चर्चा आहे.

चीनने पाकिस्तानच्या या प्रयत्नांना यापूर्वीच जाहीर पाठिंबा दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चर्चेनंतर, इराण व अमेरिका यांच्यातील चर्चेचे यजमानपद भूषवण्याच्या पाकिस्तानच्या या उपक्रमाला चीनचा पूर्ण पाठिंबा असल्याचे दार यांनी पुन्हा एकदा सांगितले. त्यामुळे ही बैठर युद्ध समाप्तीसाठी आहे की, पडद्यामागे वेगेळ काही शिजत आहे, याबाबत चर्चा होत आहे.

पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव दिला आहे, जरी दोन्ही देशांमध्ये अद्याप कोणताही स्पष्ट एकमत झालेला नाही. चीन आणि काही प्रादेशिक देश या उपक्रमाला पाठिंबा देत असताना, इराणने संमिश्र संकेत दिले आहेत, ज्यामुळे राजनैतिक अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Comments are closed.