पाकिस्तानवर 21.6 लाख कोटींचे कर्ज, कर्ज देण्यामध्ये चीन-सौदी आघाडीवर

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने चीन आणि अन्य काही देशांकडे मदतीचा हात मागितला आहे. पाकिस्तान सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेला देश आहे. पाकिस्तानवर 21.6 लाख कोटींचे कर्ज आहे. पाकिस्तानला सर्वात जास्त कर्ज देणाऱ्या देशांमध्ये चीन आणि सौदी अरब ही दोन राष्ट्रे आघाडीवर आहेत. जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय कर्ज अहवाल 2024 नुसार, डिसेंबर 2024 पर्यंत चीनने पाकिस्तानला 28.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.42 लाख कोटी रुपये परकीय कर्ज दिले आहे.

पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह फाऊंडेशन (पीपीएफ) च्या अहवालानुसार, 2000 ते 2021 पर्यंत चीनने सीपीईसी अंतर्गत रस्ते, वीज प्रकल्प आणि बंदरांसाठी पाकिस्तानला मोठे कर्ज दिले. या कालावधीत 433 प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यात आले, तर डिसेंबर 2024 पर्यंत सौदी अरबने 9.16 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 77.2 हजार कोटी रुपये कर्ज दिले आहे. पाकिस्तानच्या एकूण परकीय कर्जापैकी 7 टक्के कर्ज सौदी अरबचे आहे. 1958 ते 2024 पर्यंत पाकिस्तानने 25 वेळा आयएमएफकडून 15 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज घेतले, ज्यापैकी काही परतफेड करण्यात आली आहे. पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकांवर 86.5 हजार रुपयांचे कर्ज आहे. सध्या पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था कर्जावर चालत आहे.

Comments are closed.