फक्त हिंदुस्थानी, अमेरिकी नागरिकांना प्रवेश, दुबईतील हॉटेलने पाकिस्तानी खासदाराला रुम देण्यास दिला नकार
पाकिस्तानी खासदार व माजी संसद अध्यक्ष असद कैसर यांना दुबईतील एका हॉटेलने रुम देण्यास चक्क नकार दिला. आम्ही फक्त हिंदुस्थानी व अमेरिकेचा पासपोर्ट असलेल्यांनच रुम देतो असे कैसर यांना या हॉटेलमध्ये सांगण्यात आले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा आतंरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.
असद कैसर हे दुबईवरून पाकिस्तानला येत असताना त्यांचे फ्लाईट रद्द झाले. त्यानंतर विमानतळा जवळच्या हॉटेलमध्ये रुम बुक करायला गेले असता तिथे फक्त हिंदुस्थानी व अमेरिकेन पासपोर्ट असणाऱ्यांनाच रुम देण्यात येणार अशा घोषणा होत होत्या. त्यावरून कैसर हे संतापले. त्यांनी तिथल्या प्रशासनाला जाब विचारला मात्र त्यांनी त्यांच्याकडे फार लक्ष दिले नाही. याबाबत कैसर यांनी ट्विट केले आहे.
असद कैसर यांनी हा मुद्दा पाकिस्तानच्या संसदेत मांडला आहे. तसेच या प्रकरणात सरकारने लक्ष घालून दुबई सरकारशी बोलावे अशी मागणी कैसर यांनी केली आहे.
Comments are closed.