VIDEO: पाकिस्तानच्या मुश्ताक अहमदने गाठला उद्धटपणाचा कळस! इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचा केला अपमान

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ चा हंगाम २६ मार्चपासून सुरू झाला आहे. ही लीग तिच्या प्रसिद्धीपेक्षा बदनामीमुळे अधिक ओळखली जाते. अगदी पहिल्याच सामन्यात गुलाबी चेंडूमुळे चर्चा सुरू झाली. तो चेंडू जर्सीला घासल्यामुळे त्याचा रंग बदलला असे कारण सांगितले गेले. आता क्रिकेटविश्वात पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर टीका सुरू आहे, त्यामागचे कारण त्यांच्या माजी क्रिकेटपटूने केलेल्या इंग्लंडच्या माजी खेळाडूचा अपमान. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू मुश्ताक अहमदने पीएसएल दरम्यान इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डॉमिनिक कार्क याला सर्वांच्या समोर अपमानित केले आहे. मुश्ताकने सामन्याआधी कार्कवर टीका करताना म्हटले की, त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत इंग्लंडच्या या माजी खेळाडूला अनेकदा बाद केले आहे. यामुळे कार्कने विषय बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र मुश्ताक त्यांच्या मतावर ठाम राहिले.

मुश्ताकच्या याच वागणुकीमुळे सोशल मीडियामार्फत त्याच्यावर टीका होत आहे. त्याचे वागणे योग्य नाही, असे काहींनी म्हटले आहे, तर काहींनी त्याला शिष्टाचाराचा अभाव असल्याची टीका केली आहे.

त्या व्हिडिओमध्ये कार्क मुश्ताकला म्हणाले, “तुम्ही एक अप्रतिम गोलंदाज असून दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करत होता. ऍडम झम्पा आपल्या मागे असून तुम्ही त्याला काय सल्ला देणार.”

तेव्हा मुश्ताक यांनी सल्ला देण्याऐवजी ते म्हणाले, “मी झम्पाला काही सांगण्याआधी मला तुला एक सांगायचे आहे. मी तुला किती वेळा बाद केले, हे तुला आठवत आहे का. माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे.”

तेव्हा कार्क यांनी विषय बदलण्यासाठी म्हटले, “माझ्याबद्दल कमी, या मैदानाबद्द जास्त. मला ऍडम झम्पाबद्दल जाणून घ्यायचे आहे.”

कॉर्कने इंग्लंडसाठी ३७ कसोटी आणि ३२ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण १७२ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने कसोटीमध्ये ८६४ आणि वनडेमध्ये १८० धावा केल्या. दुसरीकडे मुश्ताक पाकिस्तानचा सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक होता. त्याने ५२ कसोटीमध्ये १८५ विकेट्स आणि १४४ वनडे सामन्यांमध्ये १६१ विकेट्स घेतल्या आहेत.

Comments are closed.