नसीम शाहच्या पोस्टमुळे PCBमध्ये खळबळ; पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, नेमक

सोशल मीडिया पोस्टवर पीसीबीने नसीम शाहला दंड ठोठावला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याच्यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळ (PCB) कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर तब्बल 2 कोटी पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नसीम शाहच्या एक्स अकाउंटवरून एक वादग्रस्त ट्विट पोस्ट करण्यात आले होते. या ट्विटमध्ये मरियम नवाज यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र काही मिनिटांतच हे ट्विट डिलीट करण्यात आले.

यानंतर नसीम शाहच्या अकाउंटवरून स्पष्टीकरण देण्यात आले की त्याचे अकाउंट हॅक झाले होते आणि त्याने ते पुन्हा रिकव्हर केले आहे. तरीही पीसीबीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.

PSLपूर्वी घडला प्रकार (PCB Fines Naseem Shah over Social Media Post)

सध्या नसीम शाह रावळपिंडी संघाकडून पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) मध्ये खेळत आहेत. 27 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात झाली असून, स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वीच हा वाद समोर आला. पीसीबीचे चेअरमन मोहसिन नक्वी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर PSL सामने प्रेक्षकांविना घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. याच संदर्भात नसीमच्या अकाउंटवरून वादग्रस्त ट्विट पोस्ट झाल्याचे सांगितले जाते.

माफी मागूनही दिलासा नाही (PCB Action Naseem Shah)

या प्रकरणात पीसीबीच्या तीन सदस्यीय शिस्तभंग समितीने सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान नसीम शाहने बिनशर्त माफी मागितली आणि आपला सोशल मीडिया मॅनेजरही काढून टाकल्याचे सांगितले. पीसीबीने त्या मॅनेजरवरही कारवाई करत त्याला पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित कोणत्याही खेळाडूसोबत काम करण्यास बंदी घातली आहे.

तरीही पीसीबीने नसीम शाहला दिलासा न देता, त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील अनेक अटींचे उल्लंघन केल्याचे ठरवत 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. याआधीही पीसीबीने आमिर जमाल याच्यावर माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याप्रकरणी 10 लाख रुपयांचा दंड लावला होता.

हे ही वाचा –

IPL 2026: BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ; मुंबई आणि कोलकाताच्या सामन्यानंतर नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.