हिंदुस्थान आमच्या पाण्याचा एक थेंबही थांबवू शकत नाही…; असीम मुनीर, बिलावल भुट्टोनंतर आता शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर आता पाकिस्तान पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसला आहे. पाकिस्तानची हतबलता त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून उघड होत आहे. माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाणी कराराचा संदर्भ देत हिंदुस्थानला पोकळ धमकी दिली होता. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही हिंदुस्थानला पाण्याबाबत धमकी देत दर्पोक्ती केली आहे. हिंदुस्थान आमच्या हक्काचा एक थेंबही पाण्यावर हिसकावू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानने चिनाब नदीवर राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प जम्मू-काश्मीरमधील सिंधू गावाजवळ बांधला जाणार आहे आणि त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. हिंदुस्थानच्या वेगवान घडामोडींमुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. आता हिंदुस्थान आपले पाणी थांबवेल, अशी धास्ती पाकिस्तानला आहे. या भीतीमुळे पाकिस्तानने अणुबॉम्बच्या धमक्या देत दर्पोक्ती करण्यास सुरुवात केली आहे.

इस्लामाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तान हिंदुस्थानला पाण्याचा एक थेंबही रोखू देणार नाही. हिंदुस्थानने नदीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी पाणी थांबवण्याची धमकी दिली तर पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही हिसकावून घेतला जाऊ शकत नाही. तुम्ही असे करण्याचा प्रयत्न केला तर धडा शिकवला जाईल, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेनंतर हिंदुस्थानने सिंधू पाणी करारावर औपचारिक बंदी घातली. तो रद्द करण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सीसीएस) च्या बैठकीत घेण्यात आला. दहशतवादाला संरक्षण दिल्याबद्दल पाकिस्तानला धडा शिकवणे हा त्याचा स्पष्ट उद्देश होता.
हिंदुस्थानच्या या निर्णयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानची सिंचन व्यवस्था, शेती आणि वीजनिर्मिती सतलज, बियास, रावी नद्यांच्या पाण्यावर अंबलंबून आहे.

माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनीही सिंधू पाणी करार रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध गरळ ओकली आहे. भुट्टो यांनी निलंबनाच्या निर्णयाला सिंधू संस्कृती आणि संस्कृतीवर हल्ला म्हटले आहे. भुट्टो यांनी धमकी दिली की जर युद्ध झाले तर आम्ही झुकणार नाही आणि जर तुम्ही सिंधू नदीवर अतिक्रमण करण्याचे धाडस केले तर पाकिस्तान तुमचा सामना करण्यास तयार आहेत, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान सिंधू पाणी करारावर विधान केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुनीर म्हणाले होते की जर भारताने सिंधू नदीवर धरण बांधले तर आम्ही त्याला तसे करू देऊ, असे ते म्हणाले होते.

Comments are closed.