पाकिस्तानची आशिया चषक हॉकी स्पर्धेतून माघार, सुरक्षेच्या कारणास्तव हिंदुस्थानात येण्यास नकार

हिंदुस्थानात होणाऱया आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तान संघ सहभागी होणार नाही. हिंदुस्थानातील सुरक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त करत पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (पीएचएफ) आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला (एफआयएच) आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. बिहारच्या राजगीर स्टेडियमवर 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. हिंदुस्थाननेही पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला नव्हता. हिंदुस्थानचे सामने दुबईच्या न्यूट्रल व्हेन्यूवर खेळवले गेले होते.

‘पीएचएफ’चे अध्यक्ष तारिक बुगती यांनी सांगितले की, ‘आमचे खेळाडू हिंदुस्थानात एशिया कपमध्ये खेळण्यास इच्छुक नाहीत. ही स्पर्धा वर्ल्ड कप क्वालिफिकेशनसाठीदेखील महत्त्वाची आहे. त्यामुळे ‘एफआयएच’ आणि आशियाई हॉकी महासंघाला (एएचएफ) या परिस्थितीवर तोडगा काढावा लागेल.

हिंदुस्थानात आमच्या खेळाडूंच्या सुरक्षिततेची काय हमी, असा सवाल तारिक बुगती यांनी विचारला आहे. ते म्हणाले, ‘आम्ही एफआयएच व एएचएफकडून उत्तराची प्रतीक्षा करीत आहोत. मात्र, पाकिस्तान सरकारने अद्यापि यावर अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

हिंदुस्थानी क्रीडा मंत्रालयाने दिली होती परवानगी

हिंदुस्थानी क्रीडा मंत्रालयाने पाकिस्तानी संघाला हिंदुस्थानात एशिया कप खेळण्याची परवानगी दिली होती. मीडिया रिपोर्टनुसार, मंत्रालयाने सांगितले होते की, बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणत्याही परदेशी संघाच्या सहभागाला हिंदुस्थान विरोध करत नाही. मात्र, द्विपक्षीय मालिकेच्या बाबतीत धोरण वेगळे आहे.

महिला वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत

यंदाच्या ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थानात होणाऱया महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघ सहभागी होणार नाही. त्यांच्या सर्व सामन्यांचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार आहे. व्हॉलीबॉल स्पर्धाही पाकिस्तानऐवजी उझबेकिस्तानमध्ये मध्य आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धा पाकिस्तानऐवजी उझबेकिस्तानमध्ये हलविण्यात आली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी व्हॉलीबॉल संघाने पाकिस्तान दौऱ्यास नकार दिला होता. त्यामुळे ही स्पर्धा इस्लामाबादऐवजी ताश्पंद येथे आयोजित केली जात आहे.

हिंदुस्टा-पाक समनाने रद्द केली

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (डब्ल्यूसीएल) क्रिकेट स्पर्धेतील हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यानचा सामना रद्द करण्यात आला आहे. हिंदुस्थानी खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागला. बार्ंमगहॅम येथे 20 जुलै रोजी हा सामना खेळवला जाणार होता. सुरेश रैना, शिखर धवन, हरभजन सिंग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी सहभागी होण्यास नकार दिला होता.

Comments are closed.