वेड्यांचा बाजार… आधी फोटो क्रॉप केला, नंतर डॅमेज कंट्रोल; जगभरात हसं झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून सारवासारव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद पार पडली. या परिषदेला हिंदुस्थान, रशिया, चीन आणि पाकिस्तानसह इतर देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. या परिषदे दरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा पार पडली. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाने केलेल्या एका कृत्यामुळे त्यांचे जगभरात हसे झाले. सोशल मीडियावर टीकेची झोड उठू लागल्यानंतर शरीफ यांना स्वत: सारवासारव करावी लागली.

नेमकं प्रकरण काय?

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांचे एकत्रित फोटो काढण्यात आला होता. या फोटोसेशनचे फोटोही समोर आले. पाकिस्तानने सकाळी पावणे बारा वाजता सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले. मात्र फोटो शेअर करताना पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने खोडसाळपणा केला. या फोटोतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांना क्रॉप करण्यात आले.

Comments are closed.