Asia Cup 2025: पाकिस्तान टीमच्या निवडीचा भारतावर किती परिणाम? सामन्यापूर्वी जाणून घ्या समीकरण
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत आहे. ही स्पर्धा तिसऱ्यांदा टी20 फॉरमॅटमध्ये खेळली जाणार आहे. यापूर्वी 2016 आणि 2022 मध्ये आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये पार पडली होती. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आयसीसी स्पर्धेप्रमाणेच आशिया कपमध्येही नेहमीच कडवी झुंज पाहायला मिळते. यंदाच्या स्पर्धेतही 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.
भारताची टीम (Indian cricket team) जाहीर होण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली टीम जाहीर केली आणि धक्कादायक निर्णय घेत दोन माजी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान (Babar Azam & mohmmed Rizwan) यांना बाहेर ठेवले. पाकिस्तानने आपल्या टीमचा कर्णधार लाहोरचा ऑलराउंडर सलमान अली आगा याला केले आहे.
आशिया कपचे विजेतेपद भारताने 8 वेळा, तर पाकिस्तानने 6 वेळा पटकावले आहे. पीसीबीने सलमान अली आगा यांच्या नेतृत्वाखाली 17 सदस्यीय टीम जाहीर केली आहे. या टीममध्ये शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रऊफ, हसन अली असे जबरदस्त पेसर्स असून अबरार अहमद, सूफियान मुकीम आणि मोहम्मद नवाझ असे स्पिनर्सही आहेत. फखर झमान, सईम अय्यूब आणि शाहिबजादा फरहान असे आक्रमक फलंदाजही समाविष्ट आहेत.
भारतीय निवडकर्त्यांना पाकिस्तानच्या पेस बॅटरीबरोबरच स्पिनर्सच्या जाळ्याचाही विचार करावा लागणार आहे. युएई हा पाकिस्तानसाठी दुसरे घरच आहे. याशिवाय पाकिस्तानची टीम अफगाणिस्तान आणि यूएईसोबत स्पर्धेपूर्वी एक त्रिकोणी मालिका खेळणार आहे.
भारताची संभाव्य टीम
भारतीय टीममध्ये अभिषेक शर्मा सारखा टॉप स्ट्राईक रेट (SR 194) असलेला ओपनर आहेच. फलंदाजीची खोली (बॅटिंग डेप्थ)ही भरपूर आहे. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती असे ऑलराउंडरही टीममध्ये असू शकतात. जसप्रीत बुमराहने स्वतःला निवडीसाठी उपलब्ध करून दिले आहे. बुमराह आशिया कपमध्ये खेळल्यास टीम इंडियाचे कॉम्बिनेशन धडाकेबाज ठरू शकते.
संभाव्य भारतीय संघ
फलंदाज : अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा / श्रेयस अय्यर, केएल राहुल / जितेश शर्मा / संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल (उप-कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, वरुण चक्रवर्ती
गोलांडज: कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अरशदीप सिंग
Comments are closed.