PCBची मोठी घोषणा! क्रिकेटच्या मैदानात पसरली भीती, तिरंगी मालिकेचं वेळापत्रक बदललं, नेमकं काय घड
पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे T20I तिरंगी मालिका पूर्ण वेळापत्रक: इस्लामाबादमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर श्रीलंका संघाची सुरक्षा वाढवण्यात आली असून, उर्वरित दोन वनडे सामन्यांच्या तारखा एक दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण स्पर्धा एका शहरातच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील आगामी टी20 त्रिकोणी मालिकेचा नवा कार्यक्रम जाहीर केला आहे. या मालिकेतील सर्व सामने आता रावळपिंडी येथे खेळवले जाणार आहेत.
यजमान आणि श्रीलंका यांचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेपूर्वी झिम्बाब्वे क्रिकेट पाकिस्तानात दाखल झाले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोट होऊनही ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार पुढे जाण्याची अपेक्षा आहे. श्रीलंका क्रिकेटने त्यांचे खेळाडू भाग घेणार असल्याची पुष्टी केली आहे, तर पाकिस्तानने… pic.twitter.com/n4SidkQ4IK
— ॲडम थियो🇿🇼🏏 (@AdamTheofilatos) १३ नोव्हेंबर २०२५
18 नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात (Pakistan T20I Tri-Series begin 18 November)
ही त्रिकोणी मालिका 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होईल. 29 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यासह सर्व सामने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरू होतील. प्रत्येक संघ लीग टप्प्यात चार सामने खेळेल, त्यानंतर सर्वोच्च दोन संघ अंतिम फेरीत भिडतील.
श्रीलंका संघासाठी उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था
ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा श्रीलंका क्रिकेटने इस्लामाबादमधील स्फोटानंतर सुरक्षा चिंतेची व्यक्त केलेली असतानाही आपल्या खेळाडूंना पाकिस्तानमध्येच राहण्याचे निर्देश दिले आहेत. PCB अध्यक्ष आणि गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी श्रीलंकेचे उच्चायुक्त आणि वरिष्ठ अधिकार्यांशी भेट घेऊन पाहुण्या संघासाठी उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित केल्याचे सांगितले आहे. त्यांनी एक्स (X) वर लिहिले, “खेळभावना आणि एकतेची भावना उजळून निघत आहे.” झिम्बाब्वेचा संघ गुरुवारी पहाटे पाकिस्तानात दाखल झाला आहे. ही त्रिकोणी मालिका 2026 टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने तिन्ही संघांसाठी महत्त्वाची तयारी ठरणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने T20I त्रि-राष्ट्रीय स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकाची पुष्टी केल्यानंतर झिम्बाब्वे क्रिकेट आता आपले सर्व सामने रावळपिंडीत खेळेल.
पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा समावेश असलेली ही स्पर्धा 18 ते 29 दरम्यान रावळपिंडी येथे आयोजित केली जाईल… pic.twitter.com/UhAR2sGUFb
— ॲडम थियो🇿🇼🏏 (@AdamTheofilatos) १३ नोव्हेंबर २०२५
मालिकेचे वेळापत्रक (सर्व सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर) : (Pakistan T20I Tri-Series Full schedule Update)
- 18 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
- 20 नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे
- 22 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
- 23 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
- 25 नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे
- 27 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
- 29 नोव्हेंबर – अंतिम सामना
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.