T-20WC2026: भारत-पाकिस्तानसह ‘या’ संघांची सुपर-8 मध्ये धडक; पाहा संपूर्ण वेळापत्रक जाहीर!

पाकिस्तानने नामिबियाचा 102 धावांनी मोठा पराभव करून सुपर-8 फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. भारत आणि पाकिस्तानसह (India vs Pakistan) आता एकूण 8 संघांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. सुपर-8 फेरी 21 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 9 दिवसांत एकूण 12 सामने खेळवले जातील.
सुपर-8 गटांची विभागणी:
ग्रुप A: भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
ग्रुप B: पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका.
पहिला सामना 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान असा सामना होईल. तर भारतीय संघ 22 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. याबरोबर भारतीय संघाचा या फेरीतील शेवटचा मुकाबला 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध होईल.
सुपर-8 फेरीचे वेळापत्रक
21 फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान
22 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका
22 फेब्रुवारी: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
23 फेब्रुवारी: झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज
24 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
25 फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका
26 फेब्रुवारी: वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका
26 फेब्रुवारी: भारत विरुद्ध झिम्बाब्वे
27 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
28 फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
1 मार्च: झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका
1 मार्च: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
Comments are closed.