दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज व्याजासह परत करा; युद्धाच्या धामधुमीत युएईचा पाकिस्तानला दणका, शाहबाज शरीफ सरकारची कोंडी
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका आखाती देशांना बसू लागला आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर आणि अमेरिकन कंपन्यांच्या इमारतींवर हल्ले चढवत आहेत. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने आता आपल्या आर्थिक हितसंबंधांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला फटका पाकिस्तानला बसला असून युएईने पाकिस्तानकडे आपले 2 अब्ज डॉलर्सचे (जवळपास 16 हजार कोटी) कर्ज तातडीने परत मागितले आहे. त्यामुळे शाहबाज शरीफ सरकारची कोंडी झाली आहे.
मध्यपूर्वेतील तणावामुळे सौदी अरेबिया आणि युएई सारख्या देशांच्या तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसेच इराणकडून होणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले पाहता या देशांना आता स्वतःच्या अर्थव्यवस्थेची चिंता सतावत आहे. याच कारणास्तव युएईने पाकिस्तानला दिलेली कर्जाची रक्कम तातडीने वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान या महिन्याच्या अखेरपर्यंत ही रक्कम युएईला परत करणार आहे. पाकिस्तानच्या ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’मध्ये ही रक्कम सुरक्षित ठेव म्हणून ठेवण्यात आली होती. पाकिस्तान या कर्जावर दरवर्षी 6 टक्के व्याज देत होता. यापूर्वी युएई हे कर्ज दरवर्षी रोलोव्हर करत असे. मात्र, डिसेंबर 2025 पासून ही मुदतवाढ केवळ एक-दोन महिन्यांसाठीच देण्यात आली होती. याची अंतिम मुदत 17 एप्रिल रोजी संपत आहे. ‘द इकॉनॉमिक्स टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.