नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

लीपा खोऱ्यातील भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार

मंडळ संस्था/श्रीनगर

पाकिस्तानी सैन्याने 26 अन् 27 ऑक्टोबरदरम्यान रात्री नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन पेले आहे. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या लीपा खोऱ्यात भारतीय सैन्याच्या चौक्यांच्या दिशेने गोळीबार करत मोर्टार डागले आहेत.  पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शस्त्रसंधी उल्लंघनाची ही घटना लीपा खोऱ्याच्या भागात घडली आहे. पाकिस्तानी सैन्याने काळोखाचा फायदा घेत भारतीय सैन्याच्या चौक्यांना लक्ष्य केले हेते. भारतीय सैन्याकडून चोख अन् योग्य प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आल्यावर नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला आहे. भारतीय सैन्य कुठल्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे.

पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी भीतीपोटी स्वत:च्या मध्य आणि दक्षिण हवाईक्षेत्रात अनेक हवाई मार्गांवरील वाहतूक रोखण्याची अधिसूचना जारी केली आहे. भारत सीमेवर ट्राय-सर्व्हिसेस एक्सरसाइज त्रिशूलची तयारी करत असताना पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. परंतु पाकिस्तानने 28-29 ऑक्टोबरसाठी या नोटॅमचे (एअरमॅनला नोटीस) कुठलेही कारण सांगितलेले नाही. परंतु हे एखादा सैन्यसराव किंवा संभाव्य शस्त्रास्त्र चाचणीशी निगडित असू शकते असे विश्लेषकांचे सांगणे आहे.

भारताने 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत पाकिस्तान सीमेनजीक सर क्रीकच्या जवळ व्यापक स्तरावर ट्राय-सर्व्हिसेस एक्सरसाइजसाठी नोटॅम जारी केला होता.

Comments are closed.