भुरट्या संघाला हरवून पाकिस्ताननी ट्रॉफी जिंकली, पण सोशल मीडियावर चर्चा मात्र हार्दिक पांड्याची


हाँगकाँग षटकार जिंकणारा पाकिस्तान 2025 : भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानने जबरदस्त पुनरागमन करत सलग तीन सामने जिंकले आणि रविवारी हॉन्गकॉन्ग सिक्सेस 2025चे विजेतेपद आपल्या नावावर केले. अब्बास आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेला, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला आणि अंतिम फेरीत कुवेतला पराभूत करत विक्रमी सहाव्यांदा हा किताब जिंकला.

अंतिम विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा स्टार खेळाडू मोहम्मद शहजादने भारतीय ऑलराउंडर हार्दिक पांड्याच्या ट्रॉफी सेलिब्रेशनची कॉपी केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या विजयानंतर पाकिस्तान आता सर्वाधिक वेळा हॉन्गकॉन्ग सिक्सेस जिंकणारा देश ठरला आहे.शहजादने पांड्यासारखी खेळपट्टीवर ट्रॉफीसह पोज दिली. शहजादने एक्स वर पोस्ट करत लिहिले की, “नेहमीप्रमाणे हाँगकाँग सिक्सेसचा मजेदार शेवट…” पाकिस्तानकडे 6 विजेतेपदे आहेत, तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका पाच-पाच वेळा विजेते ठरले आहेत.


अंतिम सामन्यात पाकिस्तानचा मोठा विजय

अंतिम सामन्यात पाकिस्तानने सर्वांगीण खेळ करत कुवेतचा 43 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 3 गडी गमावून135 धावा केल्या. अब्दुल समदने अवघ्या 13 चेंडूत 42 धावा केल्या, तर कर्णधार अब्बास आफ्रिदीने फक्त 11 चेंडूत अर्धशतक ठोकत 52 धावा फटकावल्या. कुवेतकडून मीत भावसारने तीन विकेट घेत चांगली गोलंदाजी केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना कुवेतची सुरुवात तुफानी झाली, अदनान इदरीसने पहिल्याच षटकात पाच षटकार ठोकत केवळ 8 चेंडूत 30 धावा केल्या. मात्र, त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत कुवेतचा डाव 92/6 वर आटोपला.

भारताकडूनच पत्करावा लागला पराभव

या स्पर्धेत पाकिस्तानला फक्त भारताकडूनच एक पराभव पत्करावा लागला. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पावसामुळे खंडित झालेल्या सामन्यात डीएलएस पद्धतीने दोन धावांनी विजय मिळवला होता. मात्र, त्या विजयानंतर भारताचा फॉर्म घसरला आणि पुढील चार सामने गमावत तो स्पर्धेबाहेर झाला.

हे ही वाचा –

IPL Trade News 2026 : एकाच्या बदल्यात दोन! संजू सॅमसनसाठी CSK ने लावला जोर, हुकमी एक्का सोडणार? IPL लिलावाआधी सनसनाटी डीलची चर्चा

आणखी वाचा

Comments are closed.