सलग तीन पराभव, तरीही बाहेर गेला नाही पाकिस्तान! अजूनही जिवंत आहे सेमीफायनलचं स्वप्न, जाणून घ्या
2025 महिला विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकते: पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला महिला विश्वचषकात (Pakistan Womens World Cup 2025) सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. बुधवारी कोलंबो येथे झालेल्या नवव्या लीग सामन्यात विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाला तब्बल 107 धावांनी पराभूत केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia Women vs Pakistan Women, 9th Match) प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 9 बाद 221 धावा केल्या. प्रत्युत्तर पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ 36.3 षटकांत 114 धावांवर गारद झाला. या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत (Womens World Cup 2025 Semi Final Scenario) पोहोचण्याच्या आशांवर मोठा धक्का बसला आहे.
लाजिरवाणी कामगिरी, सलग तीन पराभव, तरीही बाहेर गेला नाही पाकिस्तान…
पाकिस्तान संघाचे या स्पर्धेत सलग तीन पराभव झाले आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत पाकिस्तानला बांगलादेश, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. या परिस्थितीत पाकिस्तानसाठी उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग अधिक कठीण झाला आहे. आता संघाला उर्वरित चारही लीग सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर, चारपेक्षा अधिक संघांनी चारपेक्षा जास्त सामने जिंकू नयेत, हेही पाकिस्तानसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
सलग तीन पराभवानंतरही पाकिस्तानला सेमीफायनलची आशा जिवंत! (How Can Pakistan Still Qualify For Semifinal In Women World Cup 2025)
पाकिस्तान महिला संघाला आठ संघांच्या या स्पर्धेत अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करता येईल, जर त्यांनी त्यांचे उर्वरित चारही लीग सामने जिंकले आणि लीग टप्प्यात तीनपेक्षा जास्त संघ चारपेक्षा जास्त सामने जिंकू शकतील. आतापर्यंत, भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने 2025 च्या एकदिवसीय विश्वचषकात प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. पाकिस्तानचा पुढचा सामना 15 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध कोलंबो येथे होणार आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबरला न्यूझीलंड, तर शेवटचे दोन लीग सामने 21 आणि 24 ऑक्टोबरला अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका विरुद्ध खेळले जातील.
पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव
पाकिस्तानने आपला मोहिमेचा आरंभ 2 ऑक्टोबरला बांग्लादेशविरुद्ध केला होता, ज्यात त्यांना 7 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यात 5 ऑक्टोबरला भारताविरुद्ध, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले, पण फलंदाज निराश ठरले. भारताने दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची टीम 43 षटकांत फक्त 159 धावा करू शकली आणि 88 धावांनी सामना हरली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.