हल्ल्याशी पाकिस्तानी कंपनीचे कनेक्शन
अमेरिकेच्या उपग्रह कंपनीकडून मिळविली उपग्रहीय छायाचित्रे : मॅक्सार टेक्नॉलॉजीजने उचलले पाऊल
22 एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यापूर्वी संबंधित भूभागाची उपग्रहीय छायाचित्रे मिळविण्यात आली होती. अमेरिकेतील स्पेस टेक कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीजला पहलगाम आणि त्याच्या आसपासच्या भागांची हाय-रेझोल्युशन छायाचित्रांसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या होत्या. 2-22 फेब्रुवारीदरम्यान मॅक्सार टेक्नॉलॉजीजला कमीतकमी 12 ऑर्डर मिळाल्या. हे सामान्य स्वरुपात दुप्पट प्रमाण होते. या कंपनीच्या ग्राहकामंध्ये पाकिस्तानची बिझनेस सिस्टीम्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (बीएसआय) देखील सामील होती. या कंपनीचे नाव अमेरिकेत झालेल्या संघीय गुन्ह्यांशी संबंधित आहे. आता मॅक्सार टेक्नॉलॉजीजने बीएसआयसोबतची भागीदारी संपुष्टात आणली आहे. परंतु पहलगामच्या उपग्रहीय छायाचित्रांची ऑर्डर बीएसआयने दिली होती असे मानले जात आहे. पहलगामच्या उपग्रहीय छायाचित्रांसाठी ऑर्डर जून 2024 पासूनच प्राप्त होऊ लागल्या होत्या. मॅक्सार पोर्टलच्या अॅक्सेसमध्ये पहलगामसोबत जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, अनंतनाग, पुंछ, राजौरी आणि बारामुल्लासारख्या संवेदनशील क्षेत्रांची उपग्रहीय छायाचित्रे मिळाली आहेत. प्रत्येक उपग्रहीय छायाचित्राची किंमत 3 लाख रुपयांपासून सुरु होते आणि रेझोल्युशननुसार याची किंमत वाढत जाते. हल्ल्याच्या 10 दिवसांपूर्वी एक ऑर्डर ही छायाचित्रे 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यांच्या कटाकरता वापरण्यात आली काही नाही अद्याप स्पष्ट नाही, परंतु भारत मॅक्सारला ही छायाचित्रे कोणी आणि कशासाठी मागविली होती याची चौकशी करण्यास सांगू शकतो. फेब्रुवारी महिन्यात पहलगामच्या उपग्रहीय छायाचित्रांच्या ऑर्डरची संख्या सर्वाधिक राहिली. 12, 15, 18, 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी ही छायाचित्रे खरेदी करण्यात आली. मार्च महिन्यात कुठलीच ऑर्डर मिळाली नाही. यानंतर 12 एप्रिल रोजी हल्ल्याच्या 10 दिवसांपूर्वी एक ऑर्डर मिळाली. यानंतर 24 आणि 29 एप्रिल रोजी देखील उपग्रहीय छायाचित्रांसाठी ऑर्डर कंपनीला प्राप्त झाली, त्यानंतर कुठलीच नवी ऑर्डर प्राप्त झालेली नाही. मॅक्सारशी अनेक भारतीय यंत्रणा संलग्न मॅक्सार टेक्नॉलॉजीज स्वत:च्या प्रभावी उपग्रहीय छायाचित्रांसाठी ओळखली जाते. ही कंपनी 30 सीएम पासून 15 सीएमपर्यंतच्या पिक्सेल रेझोल्युशनयुक्त हाय-डेफिनेशन इमेज प्रदान करते. भारतात संरक्षण मंत्रालय आणि इस्रो समवेत अनेक शासकीय यंत्रणा मॅक्सारशी जोडल्या गेल्या आहेत. कमीतकमी 11 भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप आणि कंपन्या मॅक्सार टेक्नॉलॉजीच्या ग्राहक आणि भागीदार आहेत. या हाय-रेझोल्युशन इमेजचा वापर सर्वसाधारणपणे सैन्य संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी करते. याचबरोबर शस्त्रास्त्रांची तैनात आणि पायाभूत विकासावर देखरेख तसेच घुसखोरी अन् तस्करी रोखण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. बीएसएफच्या मालकाला शिक्षा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी बीएसएआयचा मालक ओबैदुल्लाह सईदवर अमेरिकेतून पाकिस्तान अटॉमिक एनर्जी कमशिनला हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटर इक्विपमेंट आणि सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन सोल्युशन्स अवैध स्वरुप देण्याचा आरोप केला होता. पाकिस्तानची ही एजेन्सी विस्फोटक आणि अण्वस्त्रांच्या सुट्या भागाचे डिझाइन करण्यासह त्यांचे परीक्षण करते. तसेच ठोस इंधनयुक्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना विकसित करते. याप्रकरणी ओबैदुल्लाहला एक वर्षाची शिक्षा देखील झाली होती.
Comments are closed.