पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी क्रिकेटर्स भारताच्या बाजूने, पाहा कोण काय म्हणालं
संपूर्ण भारत देश सध्या दुःखात आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. यामुळे भारत सरकार सध्या ॲक्शन मोडवर आहे. भारताचे काही खेळाडू सुद्धा या घटनेवर शोक व्यक्त करत आहेत. तसेच पाकिस्तानचे क्रिकेटर खेळाडू सुद्धा या समर्थनात भारताला पाठिंबा देत आहेत. जाणून घ्या की कोणत्या कोणत्या पाकिस्तान क्रिकेटर खेळाडूंनी भारताला पाठिंबा दिला आहे.
पाकिस्तानसाठी खेळलेल्या शेवटचा हिंदू क्रिकेटर दानिश कनेरियाने रागामध्ये पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांना सुनावले आहे, कणेरीया म्हणाला, जर पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्यामध्ये कोणताही हात नाही तर पंतप्रधान शहबाज शरीफने आतापर्यंत या घटनेवर शोक का व्यक्त केला नाही. हे सर्व करणं तर दूरचं पण त्यांनी आर्मीला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तुम्ही देशद्रोह्यांना जागा देत आहात, त्यांचे रक्षण करत आहात तुम्हाला लाज वाटली पाहिजे असेही तो म्हणाला.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिजने सोशल मीडियावर लिहिले, पहलगामच्या या घटनेने खूप दुःख झाले आहे. तसेच बासित अलीने सुद्धा म्हटले आहे की, ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफी मिळता कामा नये. कोणताही धर्म दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेण्यासाठी प्रवृत्त करत नाही. किंवा कुठल्याही धर्मात हे लिहिलेले नाही. ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांचा जीव घेतला आहे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
तसेच अनेक भारतीय खेळाडूंनी सुद्धा मृत लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यांच्या परिवाराबद्दल सहानुभूती दर्शवली आहेत. शुबमन गिलने शोक व्यक्त करत म्हटले आहे की, अशा क्रूर लोकांना आपल्या भारत देशात जागा नाही. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांनी म्हटले आहे की, भारत देशा या घटनेचा बदला नक्कीच घेईल. यानंतर गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा भेटली होती. तसेच सचिन तेंडुलकर, विराट कोहली,रोहित शर्मा यांनी तसेच बाकी क्रिकेट खेळाडूंनी सुद्धा या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
Comments are closed.