पंजाब सीमेवर पाकिस्तानी घुसखोरांना अटक केली

वृत्तसंस्था/ अमृतसर

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद हालचालींमुळे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एका पाकिस्तानी नागरिकाला पंजाबमध्ये अटक केली आहे. ही अटक अमृतसर सेक्टरमधील बॉर्डर आउट पोस्ट (बीओपी) मुल्लाकोट येथून करण्यात आली. अटक करण्यात आलेला घुसखोर पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले असून त्याची अधिक चौकशी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडून त्याची अद्याप ओळख उघड करण्यात आलेली नाही. त्याच्याकडील मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. घुसखोरीमागील त्याचा इरादा शोधण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

Comments are closed.