पाकिस्तानी नॅशनल नॅशनल लॉट जवळ

पुंछमध्ये केली होती घुसखोरी : तपास सुरू

वृत्तसंस्था/ जम्मू

भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजीक एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेण्यात आल्यावर नियंत्रण रेषेवरील देखरेख वाढविण्यात आल्याचे सैन्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यापूर्वी 3 मे रोजी घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला बीएसएफने पकडले होते. तर मागील आठवड्यात  राजस्थानात बीएसएफने एका पाकिस्तानी रेंजरला पकडले असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

3 मे रोजी बीसएफने भारतीय क्षेत्रात घुसलेल्या पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतले होते. दरिया मंसूरच्या बॉर्डर आउट पोस्ट साहपूरमध्ये तैनात बीएसएफ जवानांना भारतीय क्षेत्रात संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. झुडुपांमध्ये लपून बसलेल्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले होते. या घुसखोराची पाकिस्तानी नागरिक हुसैन अशी ओळख पटली होती.

पाकिस्तानच्या गुजरांवाला येथील एका गावाचा रहिवासी 24 वर्षीय हुसैनला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पाकिस्तानी चलन आणि एक ओळखपत्र हस्तगत झाले आहे.

Comments are closed.