पाकिस्तानी अधिका official ्याने हद्दपार केले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानच्या भारतातील दूतावासातील एका अधिकाऱ्याची केंद्र सरकारने हाकलपट्टी केली आहे. या अधिकाऱ्याने 24 तासांच्या आत देश सोडावा असा आदेश त्याला देण्यात आला आहे. हा अधिकारी भारत विरोधी कारवाया करीत होता, असा आरोप करण्यात आला आहे. 13 मे या दिवशीही अशाच प्रकारे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याची हाकलपट्टी करण्यात आली होती.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली, तरी तणावाचे वातावरण आहे. चार दिवसांच्या सशस्त्र संघर्षात पाकिस्तानची प्रचंड हानी झाल्याने त्या देशाचे प्रशासन आतून धुमसत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात गोंधळा माजविण्याचा प्रयत्न त्या देशाच्या हस्तकांकडून होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरुन केंद्र सरकारने सर्वत्र दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्ताच्या दूतावास अधिकाऱ्यांनी त्यांच्या विशेषाधिकाराचा दुरुपयोग करु नये, असा कठोर इशारा भारताने त्या देशाला दिला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार या अधिकाऱ्याचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. मात्र, तो वरीष्ठ अधिकारी असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
Comments are closed.