कोलकात्यात पाकिस्तानी ऑपरेटिव्हला अटक

कोलकाता: पाकिस्तानच्या हेरजाळ्याच्या विरोधात कारवाई करत एनआयएने कोलकात्यातून जाफर रियाज या हस्तकाला अटक केली आहे. रियाज हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात राहून भारताची संवेदनशील माहिती पुरवत होता. जाफरने एका पाकिस्तानी महिलेसोबत विवाह केला होता. त्याची पत्नी आणि मुले पाकिस्तानात राहतात. 2005 नंतर तो अनेकदा पाकिस्तानात गेला होता आणि याचदरम्यान तेथील गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात आला होता.

Comments are closed.