अर्धसैनिक दल मुख्यालयावर हल्ला

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील अर्धसैनिक दलाच्या मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. या हल्ल्यात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) चे 3 जण ठार झाले. अर्धसैनिक दलाने दावा केला आहे की, चगाई जिह्यातील नोकुंडीमध्ये फ्रंटियर कोर मुख्यालयावर आत्मघाती हल्ला केल्यानंतर बीएलएच्या दहशतवाद्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही घुसखोरी हाणून पाडली. यात तीन दहशतवादी ठार झाले.

Comments are closed.