पाकिस्तानचा एअर बेस अद्याप अक्षम आहे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने पाकिस्तानच्या विरोधात चालविलेल्या ‘सिंदूर’ अभियानाच्या अंतर्गत पाकिस्तानमधील जे वायुतळ उध्वस्त करण्यात आले होते, त्यांच्यापैकी बव्हंशी अद्यापी निकामीच आहेत, असे उपग्रहीय छायाचित्रांच्या आणि प्रतिमांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. विशेषत: रहिमयार खान येथील वायुतळाच्या धावपट्टीला भारताने मोठ्या प्रमाणावर हानी पोहचविली होती. ही धावपट्टी आजही निकामी असून ती दुरुस्त करणे अद्यापही पाकिस्तानला साध्य झालेले नाही, असे या छायाचित्रांवरुन दिसून येत आहे. भारताने हल्ला केलेल्या पाकिस्तानातील स्थानांवर सातत्याने उपग्रहांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. भारताने या अभियानात पाकिस्तानची किती हानी केली होती, हे त्यांच्या आजच्या स्थितीवरुन अधिकच मोठ्या प्रमाणात सिद्ध होत आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
रहिमयार खान वायुतळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून तीनदा करण्यात आला होता. तथापि, एकदाही यश आले नाही. त्यामुळे हा तळ 5 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येईल, असा संदेश पाकिस्तानच्या वायुतळाने आपल्या प्रशासनला दिला आहे, ही माहितीही भारताला उपलब्ध झाली आहे. या धावपट्टीच्या मधोमध भारताच्या हल्ल्यामुळे मोठे ख•s पडले असल्याने त्याची दुरुस्ती विदेशी साहाय्याशिवाय पाकिस्तानला करता येणार नाही, अशीही प्रतिक्रिया आहे.
Comments are closed.