आज पाकिस्तान बाहेर होणार? श्रीलंका की न्यूझीलंड, कोणाच्या विजयाने पाकचा फायदा? जाणून घ्या पूर्ण समीकरण

श्रीलंका आणि न्यूझीलंड (Shrilanka vs Newzealand) यांच्यातील सुपर-8 चा सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला हा निर्णय योग्यही ठरला. पहिल्या 26 चेंडूंच्या आतच न्यूझीलंडने आपले दोन्ही सलामीवीर गमावले. हा सामना श्रीलंका आणि न्यूझीलंडसाठी जेवढा महत्त्वाचा आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. आज कोणाच्या विजयामुळे पाकिस्तानला जास्त फायदा होईल.
सुपर-8 च्या दुसऱ्या गटातून इंग्लंडने आधीच सेमीफायनलचे तिकीट पक्के केले आहे. दुसऱ्या सेमीफायनल स्लॉटसाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात चुरस आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी एक गुण आहेत, तर श्रीलंकेचे अद्याप गुणांचे खाते उघडलेले नाही. खरं तर, आज श्रीलंकेचा विजय होवो किंवा न्यूझीलंडचा, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होणार नाही, पण त्यांचे सेमीफायनलमध्ये जाणे दोन्ही परिस्थितींमध्ये इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून असेल.
जर आज श्रीलंकेने न्यूझीलंडवर विजय मिळवला, तर त्यांचे 2 गुण होतील, तर न्यूझीलंडकडे फक्त एकच गुण राहील. अशा स्थितीत पाकिस्तानला असे वाटेल की, 27 फेब्रुवारीला न्यूझीलंडला इंग्लंडवर मोठा विजय मिळू नये. जर इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला, तर ते पाकिस्तानसाठी खूप फायदेशीर ठरेल.
तसेच जर न्यूझीलंडने आज श्रीलंकेचा पराभव केला, तर पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात. अशा वेळी न्यूझीलंडचे 3 गुण होतील आणि त्यांचा नेट रन-रेट देखील पाकिस्तानपेक्षा खूप चांगला होईल. या परिस्थितीत पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवावा असे वाटेल. त्याचबरोबर पाकिस्तानचा आता फक्त एकच सामना शिल्लक आहे, जो त्यांना 28 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे.
Comments are closed.