Asia Cup: आशिया कपमध्ये पाकिस्तानकडे शेवटची संधी, सामना हरल्यास थेट स्पर्धेबाहेर? जाणून घ्या, कोणाशी भिडणार
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) कप 9 सप्टेंबरपासून सुरु झाला होता. ग्रुप स्टेजमधील थरार पार करत आता स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सुपर-4 स्टेजमध्ये ज्या टीम्स टॉप-2 मध्ये राहतील, त्या संघांमध्ये फायनल खेळला जाईल. उद्या पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SRI) यांच्यात सामना होणार आहे, जो दोघांनाही सेमीफायनल सारखा महत्त्वाचा ठरेल. सुपर-4मध्ये आतापर्यंत भारत आणि बांग्लादेशने प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे.
पॉइंट्स टेबलवर सध्या पाकिस्तान आणि श्रीलंकाची स्थिती अशी आहे की, भारत आणि बांग्लादेशने जर आपल्या पुढील दोन सामन्यांपैकी एकही सामना जिंकला, तर फायनलमध्ये जाणे त्यांच्यासाठी सोपे होईल. मात्र श्रीलंका आणि पाकिस्तानने अजूनही कोणताही सामना जिंकलेला नाही.
जर पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला, तर फायनलमध्ये जाणे त्यांच्यासाठी जवळजवळ अशक्य होईल. तशीच परिस्थिती श्रीलंकेसाठीही आहे. जर त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभव झाला, तर त्यांचे आशिया कपमधून बाहेर जाणे निश्चित होईल. त्यामुळे 23 सप्टेंबरला होणारा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना दोन्ही संघासाठी “करो किंवा मरो” प्रकारचा ठरेल.
हा सामना अबू धाबीतील शेख जायद स्टेडियममध्ये होईल. भारतीय वेळेनुसार हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित होईल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग रात्री 8 वाजता जिओ हॉटस्टार अॅपवर पाहता येईल.
Comments are closed.