पाकिस्तानच्या एक्स खाती पुन्हा बंदी घातली
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताने पाकिस्तानच्या युट्यूब आणि एक्स अकाऊंटस् वर पुन्हा बंदी घातली आहे. ही बंदी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या निर्घृण हल्ल्यानंतर घालण्यात आली होती. ती उठविल्याचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाले होते.. तथापि, गुरुवारी ही बंदी कायम असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. जोपर्यंत ‘सिंरूर’ अभियान होत आहे, तो पर्यंत ही बंदीही राहणार आहे, पाकिस्तानवरील सर्व डिजिटल आणि डिप्लोमॅटिक निर्बंधही कायम राहणार आहेत, असेही भारताने गुरुवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानची अनेक सायबर आणि डिजिटल अकाऊंटस् भारताने बंद केली होती. तथापि, काही अकाऊंटस् पुन्हा दिसत आहेत, अशी तक्रार केली जात होती. भारताने आपले पाकिस्तानविरोधातील अभियान सौम्य केले आहे काय, असाही प्रश्न विचारण्यात येत होता. तथापि, अशी कोणीतीही सूट कोणालाही दिली नसल्याचे आणि अभियान सौम्य केले नसल्याचे भारताने घोषित केले आहे. त्यामुळे पाकिस्तावरची सायबरबंदी आणि डिजिटल बंदी यापुढेही राहणार आहे. या बंदीचे सर्व आंतरराष्ट्रीय वाहिन्या आणि सायबर प्लॅटफॉर्मस्नी पालन केले पाहिजे, असे भारताच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने पुन्हा ठामपणे वर्तवले आहे.
Comments are closed.