टीम इंडियाच्या पोरींनी पलाशला धुतलं, वकिलांची धक्कादायक प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
स्मृती मानधना-पलाश मुच्छाल वकील : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी संगीतकार पलाश मुच्छल आणि स्मृती कायमचे एकमेकांचे होणार होते. मात्र ऐन लग्नाआधीच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि अखेर हे नातं तुटल्याची बातमी समोर आली. त्यावेळी पलाशने स्मृतीचा विश्वासघात केल्याचे आरोप झाले होते, मात्र दोन्ही बाजूंनी या विषयावर मौन बाळगण्यात आले होते. आता स्मृतीची जवळची मैत्रीण विज्ञान माने याने केलेल्या खुलाशामुळे हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पलाश दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला; विज्ञान मानेचा दावा (Palash Muchhal Caught Red Handed at wedding to Smriti Mandhana)
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना विज्ञान माने याने धक्कादायक दावा केला. तो म्हणाली की, “23 नोव्हेंबर 2025 रोजी मी लग्नाच्या समारंभात उपस्थित होतो. त्याच वेळी पलाशला एका दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडण्यात आलं. तो प्रसंग अत्यंत भयानक होता. तिथे उपस्थित असलेल्या काही भारतीय महिला क्रिकेटपटूंनी संतापाच्या भरात पलाशला मारहाणही केली.” या दाव्यांमुळे क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
पुरावे कुठे आहेत?, पलाशच्या वकिलांचा आक्रमक सवाल (Palash Muchhal Lawyer Reacts to Cheating Allegations)
या गंभीर आरोपांवर पलाश मुच्छलचे वकील श्रेयांश मिथारे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विज्ञान मानेचे सर्व आरोप फेटाळून लावत सवाल उपस्थित केला आहे. “हा व्यक्ती म्हणतो की त्याने आम्हाला पैसे दिले, पण त्याच्याकडे बँक ट्रान्सफर, चेक किंवा कोणताही पुरावा आहे का? पलाशला दुसऱ्या महिलेसोबत पकडल्याचा दावा केला जातोय, पण त्याचे पुरावे कुठे आहेत? एवढा काळ हा माणूस गप्प का होता? लग्न मोडल्यानंतरच तो समोर का आला?” असा सवाल वकिलांनी केला.
पलाशकडून कायदेशीर कारवाईचे संकेत
वकिलांनी पुढे स्पष्ट केलं की, पलाश मुच्छल या आरोपांविरोधात कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहेत. सध्या सांगली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, या सर्व वादावर स्मृती मानधनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती सोशल मीडियापासून दूर असून आपल्या क्रिकेट कारकिर्दीवरच लक्ष केंद्रित करत आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.