‘पलाश-स्मृती क्युट कपल, त्यांच्यात पुन्हा…’; अभिनेत्रीच्या ‘त्या’ वक्तव्यानं भुवया उंचावल्या

पलाश मुच्छाल, स्मृती मानधना यांच्यावर डेझी शाह: टीम इंडियाची (Team India) ‘धुरंधर’ क्रिकेटर स्मृती मानधनाचं (Smriti Mandhana) काही दिवसांपूर्वीच लग्न मोडलं. स्मृतीनं स्वतः सोशल मीडियावरुन यासंदर्भात माहिती दिलेली. पण, त्यापूर्वीच स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल (Palaash Muchhal) यांचं लग्न मोडल्याच्या आणि त्यासंदर्भातल्या वेगवेगळ्या अफवांना उधाण आलेलं. अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. त्याचप्रमाणे लग्न मोडल्याची अनेक कारणंही समोर आली. पण, आता दोघांनीही भूतकाळ मागे टाकून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण, अजूनही त्यांच्याबाबतच्या चर्चा काही संपण्याचं नाव घेईनात. एका बॉलिवूड अभिनेत्रीनं नुकतंच स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच्या नात्यावर भाष्य केलं आहे. अभिनेत्रीनं केलेलं वक्तव्य ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संगीतकार आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल सध्या त्याच्या आगामी सिनेमात व्यस्त आहे. अशातच पलाशच्या आगामी सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या डेझी शाहनं (Daisy Shah) पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाच्या नात्यावर केलेल्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरं तर अभिनेत्रीनं दोघांच्या वैयक्तिक आयुष्यावर कोणतंही भाष्य करणं टाळलं आहे. पण, तरीही तिनं जे वक्तव्य केलंय, ते खरोखरंच भुवया उंचावणारं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नेमक यांचा मुलगा? (पलाश मुच्छाल स्मृती मानधना संबंधावर डेझी शाह टिप्पणी)

‘मिस मालिनी’ला दिलेल्या मुलाखतीत डेझी शाहनं सांगितलं की, स्मृती मानधनासोबतच्या त्याच्या लग्नाभोवतीच्या वादानंतर, पलाशला त्याच्या पुढच्या सिनेमासाठी डेझीला विचारताना संकोच वाटत होता. डेझी म्हणाली की, “मला दोन-तीन अनोळखी लोकांचे फोन आले, ज्यांनी सांगितलं की, पलाश एक सिनेमा बनवतोय आणि तिला त्यात कास्ट करू इच्छितो. पण, तिला हे फोन विचित्र वाटले कारण, ती पलाशची बहीण पलकची अत्यंत जवळची मैत्रीण आहे…” त्यामुळे, अभिनेत्री म्हणाली की, “जर पलाशला खरोखरंच तिच्याशी संपर्क साधायचा असता, तर त्यानं तिच्याशी थेट किंवा पलकमार्फत संपर्क साधला असता. मात्र, त्यानं तसं केलं नाही. “

डेझी शाह म्हणाली की, “तिनं पलाशला एक मेसेज पाठवला आणि याबाबत विचारणा केली. त्यावर त्यानं उत्तर दिलं की, “हो, मॅडम, हे खरंय, दरम्यान, सध्याच्या परिस्थितीमुळे मी स्वतःहून कोणाशीही संपर्क साधू शकत नाही, कारण तसं केल्यास या प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे…”

मी माझं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य काटेकोरपणे वेगळं ठेवते : डेझी शाह

या मुलाखतीदरम्यान, पलाशचे नाव अलिकडेच विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आलं होतं, याविषयी डेझी शाहला विचारणा करण्यात आली की, यामुळे आपली स्वतःची सार्वजनिक प्रतिमा डागाळली जाण्याची भीती तिला वाटते का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर डेझीनं उत्तर दिलं की, “मी माझं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य काटेकोरपणे वेगळं ठेवते…”

पलाश, स्मृती क्युट कपल, त्यांनी पुन्हा एकत्र यावं : डेझी शाह

वस्तुस्थिती नक्की काय आहे, हे मला माहीत नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. हे दोन कुटुंबं आणि मोजक्याच व्यक्तींशी संबंधित एक खाजगी प्रकरण आहे, सत्य नक्की काय आहे, हे केवळ त्यांनाच माहीत आहे. आपण मात्र केवळ सोशल मीडियावर जे पाहिलं आणि ऐकलं आहे, त्या आधारावर एखाद्या प्रकरणाचा न्याय करतोय…”

“याचा अर्थ असा नाही की, मी कोणत्याही महिलेच्या दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करतेय. मी कोणाचीही बाजू घेत नाहीये… पलाश आणि स्मृती क्युट कपल होतं. त्यांच्यात सर्व काही सुरळीत व्हावं आणि ते पुन्हा एकत्र यावेत, अशी मी प्रार्थना करते…”, असं डेझी शाह म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Smriti Mandhana Video : मी सगळ्या खेळाडूंकडे क्रिकेटर म्हणून बघते, फक्त हार्दिक पांड्या… स्मृती मानधनाने मनातलं सगळं बोलून टाकलं, Video

आणखी वाचा

Comments are closed.