पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं का
पलाश मुच्छल प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालय: भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मंधनाशी (Smriti Mandhana) लग्न मोडल्यानंतर संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchchal) याच्यावर अनेक आरोप करण्यात आले. 23 नोव्हेंबरला स्मृती आणि पलाशचं लग्न होणार होतं. आधी वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकळण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर अनेक गोष्टी समोर येत गेल्या आणि अखेर दोघांनीही जाहीरपणे लग्न मोडल्याचं सांगत आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्मृती आणि पलाश दोघेही चर्चेत होते. स्मृती मंधनाचा मित्र व सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर विज्ञान माने याने पलाशवर अनेक गंभीर आरोप केले होते. आर्थिक फसवणुकीचाही दावा त्याने केला होता. या आरोपांनंतर पलाशने विज्ञान मानेवर मानहानीचा दावा दाखल केला होता. या मानहानी प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने विज्ञान मानेला मीडिया मुलाखती आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पलाश मुच्छल आणि त्याच्या आईविरोधात कथित मानहानीकारक वक्तव्ये करण्यास मज्जाव केला आहे. या आदेशामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कोर्टाने काय म्हटलं?
न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवत म्हटलं की, विज्ञान माने यांच्या मुलाखतींचा आधार 23 नोव्हेंबर 2025 च्या घटनेशी जोडला गेला असला, तरी प्रथमदर्शनी तो या प्रकरणात संबंधित वाटत नाही. विशेषतः जेव्हा फिर्यादी आणि प्रतिवादी यांच्यात व्यावसायिक वाद आहे. मुलाखतींचे ट्रान्सक्रिप्ट तपासल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की दोघांमध्ये व्यावसायिक वाद स्पष्ट दिसतो. मुच्छल हे भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार असून त्यांना सहा पुरस्कार मिळाले असल्याची नोंदही न्यायालयाने घेतली. सर्व बाबींचा विचार करून पीठाने “मजबूत prima facie केस बनत असल्याचे सांगत विज्ञान मानेला पुढील मानहानीकारक उल्लेख किंवा सूचक वक्तव्ये करण्यास अंतरिम बंदी घातलीय.
पलाश मुच्छलने कोर्टाचा दरवाजा ठोठावला
पलाश मुच्छलने वकील सिद्धेश भोले, अश्विन पिंपले आणि श्रेयस मिथारे यांच्या माध्यमातून न्यायालयात धाव घेतलेली. त्याने विज्ञान मानेच्या कथित मानहानीकारक विधानांमुळे स्वतःची आणि कुटुंबाची प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत नुकसानभरपाई आणि कायमस्वरूपी स्थगितीची मागणी केली होती. वकिलांनी सांगितले की या मुलाखतींमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विज्ञान माने हा स्मृती मंधानाचा बालपणीचा मित्र आहे. त्याने पलाश मुच्छलसोबत एक चित्रपट सह-निर्मितीचं आश्वासन दिलं होत. पालाश्ने मोठी रक्कम गुंतवली; मात्र ठरलेली रक्कम न दिल्याने दोघांत वाद निर्माण झाला. याच काळात मुच्छल आणि मंधाना यांचे लग्न तुटले आणि त्यानंतर विज्ञान माने याने दिलेल्या मुलाखतींना पलाश मुच्छल मानहानीकारक म्हटलेले.
40 लाखांची फसवणूक, 10 कोटींची मानहानी नोटीस
दरम्यान, सांगलीत दाखल तक्रारीत विज्ञान माने याने आरोप केला होता की पलाशने चित्रपट निर्मितीसाठी त्यांच्याकडून 40 लाख रुपये घेतले, मात्र चित्रपट पूर्ण झाला नाही. तसेच त्यांनी एका मुलाखतीत मुच्छल आणि मंधाना यांचे लग्न तुटण्याबाबतही वादग्रस्त दावा केला होता. या पार्श्वभूमीवर पलाश मुच्छलने इन्स्टाग्रामवर अधिकृत निवेदन देत सांगितले की, त्यांच्या वकील श्रेयांश मिथारे यांनी विद्यान मानेला 10 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठवली आहे. “माझी प्रतिमा आणि करिअर जाणीवपूर्वक खराब करण्यासाठी खोटे आणि अत्यंत मानहानीकारक आरोप करण्यात आले,” असे त्याने नमूद केले.
आणखी वाचा
Comments are closed.