पलाश मुच्छलचं कथित चॅट व्हायरल, लग्नाच्या आदल्या रात्री धोका दिल्याची चर्चा किती खरी?
Palash Muchhal Cheat Smriti Mandhana : भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते. मात्र लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीच्या वडिलांची (Smriti Mandhana Father) तब्येत बिघडली, त्यानंतर वाढलेल्या तणावामुळे पलाशलाही (Palash Muchhal) रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यात स्मृतीने इंस्टाग्राम पोस्ट डिलीट केल्या. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा, तर्क-वितर्क लावायला सुरुवात झाली.
अचानक बिघडलेली तब्येत
सांगलीत 23 नोव्हेंबर रोजी विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार होता. हलदी, मेहंदी, संगीत यांसारख्या सर्वही विधी आनंदात आटोपले होते. पण लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडली. नाश्ता करताना त्यांना हृदयविकारासारखी लक्षणे दिसू लागली. त्यांना तातडीने सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की अतिशय व्यस्त कार्यक्रम, थकवा आणि मानसिक ताण यामुळे त्यांचे स्वास्थ्य बिघडले असावे. त्यापूर्वी ते अत्यंत उत्साहाने कुटुंबासोबत नाचताना आणि इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करतानाही दिसले होते.
स्मृती मानधना नाही तर पलाशने लग्न पुढे ढकललं; आईने सगळंच सांगितलं
स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच पलाश मुच्छल पण खचून गेला. पलाशची आई अमिता मुच्छल यांनी सांगितले, “स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचे समजताच पलाश रडू लागला. हळद झाल्यामुळे आम्ही त्याला बाहेर पडू देत नव्हतो, पण पलाशला त्यांना भेटायला जायचे होते. वडिलांची तब्येत आधी ठीक होऊ दे, मग आपण लग्न करू.’ लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वप्रथम पलाशनेच घेतला.
व्हायरल चॅटची चर्चा, पण पुष्टी नाही
लग्न पुढे ढकलल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही चॅट स्क्रीनशॉट व्हायरल झाले. एका महिलेने हे स्क्रीनशॉट शेअर केले ज्यात पलाशसोबत झालेली कथित ‘फ्लर्टिंग’ चॅट असल्याचा दावा करण्यात आला. त्या चॅटमध्ये पलाशने तिच्या लुक्सची प्रशंसा केली होती आणि तसेच पहाटे बीचवर जाऊ असे सांगितले होते. मात्र हे स्क्रीनशॉट किती जुने आहेत, कोणत्या संदर्भात आहेत, याची कोणतीही ठोस माहिती एबीपी माझाकडे नाही.
हे स्क्रीनशॉट किती खरे आहे, किंवा खोटे आहे, त्यांची पुष्टी एबीपी माझा करत नाही. अजून तरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. तरीही नेटिझन्सकडून पलाशवर टीकेची झोड उठली. दुसरीकडे, काहींनी या संवेदनशील काळात दोन्ही कुटुंबांना एकटे सोडण्याची विनंती केली.
स्मृतीने व्हिडिओ, फोटो केले डिलीट
सोशल मीडियावर आणखी चर्चां तेव्हा झाली जेव्हा चाहत्यांनी पाहिले की स्मृती मानधना हिने आपल्या इंस्टाग्रामवरून हळदी, मेहंदी, साखरपुडा यांसारख्या सर्व विवाहाशी संबंधित पोस्ट हटवले आहेत. मात्र त्यांनी पलाशसोबतच्या जुने पोस्ट, वाढदिवस, इतर पोस्ट तसेचच ठेवले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की पोस्ट हटवणे हे वैयक्तिक वादामुळे नसून परिस्थितीच्या संवेदनशीलतेमुळे असू शकते. पलाशनेही आपल्या प्रोफाइलवरून नव्या विवाहसंबंधी पोस्ट हटवल्या, तर जुन्या पोस्ट कायम ठेवल्या. त्यामुळे हा निर्णय वातावरण शांत करण्यासाठी आणि अनावश्यक अफवांना आळा घालण्यासाठी घेतल्याचे दिसून येते.
आणखी वाचा
Comments are closed.