Israel Palestine War – पॅलेस्टाईनच्या ‘पेले’चा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू, प्रसिद्ध फुटबॉलपटू काळाच्या पडद्याआड

गाझा पट्ट्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवर चिघळत चालला आहे. इस्रायलचे पॅलेस्टाईनवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात आता पॅलेस्टाईचा पेले या नावाने प्रसिद्ध असणारा फुटबॉलपटू सुलेमान अल-ओबेदचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टाईन फुटबॉल असोसिएशनने याची माहिती दिली असून दक्षिण गाझा पट्टीत मदतीची वाट पाहत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

PFA ने दिलेल्या माहितीनुसार, सुलेमान अल-ओबेद पॅलिस्टिनी फुटबॉल विश्वातील एक ख्यातनाम फुटबॉलपटू होते. त्यामुळे त्यांचा उल्लेख ‘पॅलेस्टाईनचा पेले’ असा केला जायचा. 6 ऑगस्ट रोजी गाझा पट्टीमध्ये ते मदतीची वाट पाहत असतानाच इस्रायलने हल्ला केला आणि या हल्ल्यात ते मारले गेले. ते गाझाच्या खादमत अल-शाती क्लबजे माजी फुटबॉलपटू राहिले आहेत. त्यांनी या क्लबकडून 24 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 100 हून अधिक गोल मारले आहे.

Comments are closed.