पालघरमध्ये ओव्हरहेड वायर तुटली, मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
पालघरमधील डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासानाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
Comments are closed.