पालघर इलेवन- इन्स्पायर्ड रॉयल्स जेतेपदासाठी भिडणार

सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, मुंबई आयोजित पहिल्या सूर्यवंशी क्षत्रिय टी- ट्वेंटी क्रिकेट लीगमध्ये प्राईड ऑफ पालघर इलेवन विरुद्ध इन्स्पायर्ड रॉयल्स असा अंतिम सामना रंगेल. मुंबई पोलीस जिमखाना येथे खेळवण्यात येत असलेल्या स्पर्धेत प्राईड ऑफ पालघर इलेवनने आरडीज् ब्लास्टर्सवर 7 विकेट राखून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात इन्स्पायर्ड रॉयल्सने सूर्यवंशी वॉरियर्स संघावर 18 धावांनी मात केली.

उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात आरडीज् ब्लास्टर्सने 20 षटकांत 6 बाद 154 धावा केल्या. उत्कर्ष राऊतने 46 चेंडूंत 65 धावांची नाबाद खेळी करत त्यात मोलाचे योगदान दिले. प्राईड ऑफ पालघर इलेवनकडून चंदन दळवी (3/21) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. प्राईड ऑफ पालघर इलेव्हनने प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान 19.1 षटकांत 3 विकेटच्या बदल्यात पार केले. सलामीवीर हर्षद देसलेने नाबाद 80 धावा फटकावत मोठा विजय सुकर केला. दुसऱ्या सामन्यात इन्स्पायर्ड रॉयल्सनी टॉस जिंपून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 बाद 199 धावा केल्या. सूर्यवंशी वॉरियर्सना प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलवले नाही.

Comments are closed.