पल्लेकेलेमध्ये विजा, ढगांच्या गडगडाटासह पाऊस; SL vs ENG रद्द झाला तर पॉइंट्स टेबलमध्ये होणार उल
SL vs ENG T20 विश्वचषक 2026 पल्लेकेले आजचे हवामान : टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीतील दुसरा सामना आज श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. हा सामना कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे. मात्र, पावसामुळे या सामन्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. शनिवारी झालेला सुपर-8 मधील पहिला सामना (Pakistan vs New Zealand) पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता.
सुपर 8 डबल हेडर ॲक्शन तुमच्यासाठी येत आहे 😍
आपले #T20WorldCup प्रसारण तपशील 👉 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/0cCdtzb8dg
— ICC (@ICC) 22 फेब्रुवारी 2026
पल्लेकेलेतील हवामानाचा अंदाज (Weather Forecast in Pallekele)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारी 3 वाजता पल्लेकेले येथे सुमारे 74 टक्के पावसाची शक्यता आहे. सामन्याचा टॉस दुपारी 2:30 वाजता होणार असून त्या वेळीही सुमारे 65 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुपारी 4 ते 5 या वेळेतही सुमारे 65 टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण सामन्यावर पावसाचे सावट राहण्याची दाट शक्यता आहे.
सामना रद्द झाल्यास काय?
सुपर-8 फेरीत दोन गट असून प्रत्येक गटात चार संघांचा समावेश आहे. श्रीलंका आणि इंग्लंड हे ग्रुप-2 मध्ये आहेत. या गटातील पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्या वेळी दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला.
पल्लेकेलेमध्ये पहिल्या चेंडूला दोन तास बाकी आहेत! 🌤️🏏
आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2026 मधील सुपर 8 मधील श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात मोठा सामना आहे.
दमिथ वीरासिंघे यांचे लाइव्ह अपडेट्स 🎙️#T20WorldCup pic.twitter.com/680C9GKjJ2
— ThePapare (@ThePapareSports) 22 फेब्रुवारी 2026
जर आजचा श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सामना देखील पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. अशा परिस्थितीत या गटातील सर्व चार संघांच्या खात्यात 1-1 गुण जमा होतील. त्यामुळे कोणत्याही एका संघाला विशेष फायदा किंवा तोटा होणार नाही. सुपर-8 फेरीतील सर्व सामने पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत (सेमीफायनल) प्रवेश करतील, तर उर्वरित दोन संघ स्पर्धेबाहेर होतील. (SL vs ENG T20 World Cup 2026 Pallekele Weather Today)
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.