पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्…; शहर

Pandharpur Crime : ऐन धुलिवंदनाच्या (Dhulivandan 2025) दिवशीच पंढरपुरात (Pandharpur News) विक्रीसाठी आणलेले 30 किलो गोमांस पोलिसांनी (Police) पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी शहरातील आंबेडकरनगर परिसरात करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन संशयित आरोपींकडून आठ हजार रुपये किमतीचे सुमारे 30 किलो मांस ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुलिवंदनासाठी काल (दि. 14) शहरातील अनेक भागात मांस खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यातच पंढरपूर शहरातील आंबेडकरनगर परिसरात गोमांसाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

30 किलो गोमन काटेरी

त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींसह 30 किलो गोमांस पकडले आहे. या प्रकरणी खंडू दत्तात्रय वायदंडे व सोहेल अस्लम कुरेशी (रा. पंढरपूर) या दोघांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

कठोर कारवाईची मागणी

आरोपींनी कुठून गोमांस आणले आणि ते किती लोकांना विकले? याचीही माहिती पोलीस घेत असून आपण धुलिवंदनाला नेमके काय खाल्ले? असा प्रश्न आता खवय्यांना पडू लागला आहे. पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीच जर गोमांसाची विक्री झाली असेल तर अशांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी आता भाविकांकडून होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=gwzchfmt9ce

इतर महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Bus Accident : नादुरुस्त ट्रकला बसची जोरदार धडक; भीषण अपघातात कंडक्टरचा मृत्यू, 11 ते 12 प्रवासी जखमी

Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा

अधिक पाहा..

Comments are closed.