अवघी पंढरी हळहळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, 2 चिमुल्यांसह पत्नीची शेतातील विहिरीत उडी
सोलापूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी अवघी पंढरी दुमदुमली होती, लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीत जमला होता. टाळ, मृदुंगाचा गजर आणि विठु-माऊलींच्या जयघोषणाने अवघा आसमंत दुमदूमून गेला. पंढरीमुळे महाराष्ट्रात सळीकडे आनंदोत्सव होता. मात्र, त्याच पंढरपूर तालुक्यातून आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी 25 वर्षाची पत्नी मोनाली, सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षाची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केली. मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे समजतात पती म्हमाजी याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कासेगावातील शेतात जाऊन या विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन चिमूरड्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. घटना घडल्यापासून सातत्याने विहिरीतले पाणी उपसणे सुरू असून आत्तापर्यंत फक्त 4 वर्षांचा मुलगा कार्तिक याचा मृतदेह सापडला आहे. बाकीचे मृतदेह शोधण्यासाठी पंढरपूरची आपत्कालीन यंत्रणा विहिरीत उतरून शोध घेत आहे. पंढरपूर तालुका पोलिसात याची नोंद झाली असून पुढील अधिक तपास पोलीस यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या कुटुंबाचा प्रमुख असलेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या म्हमाजी आसबे याचा मृतदेह पोलिसांनी खाली काढला. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान, म्हमाजी आसबे यांची कासेवागावत शेती असून त्यांच्या द्राक्ष बागेतील विहिरीतच पत्नी मोनालीने तिच्या दोन चिमुकल्या मुलासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनं, कासेवागात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune/pune/punelicials-brithdays-not-be-celebrated-in-government-S-shas-divase- ऑर्डर-रेव्हेन्यू-विभाग -1368473">सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचा वाढदिवस नको, अन्यथा..; शासनाचे निर्देश, पुण्यातून संचालकांचा आदेश
Comments are closed.