पंढरपूर वार्ता – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रामजन्मोत्सव उत्सव साजरा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आज रामनवमी प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल सभामंडपामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठलास सकाळी 11.00 महानैवेद्य नंतर पांढरा पोशाख, पागोटे व साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून दुपारी 12.00 वाजता राम जन्मोत्सव  सोहळा पार पडल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल सभा मंडपामध्ये श्रीराम जन्माचे श्री. विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह.भ.प.श्री. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे  श्री. रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले किर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविकांना  प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सन्माननीय सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, सदस्य श्री संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी प्रसाद दशपुत्रे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

याशिवाय, रामनवमी जन्मोत्सवानिमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्राच्या भोजनप्रसादामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता, सुमारे 2000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याचे प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी यावेळी सांगितले.

Comments are closed.