Pandharpur News – पुंडलिक मंदिराला सुवर्ण कळस अर्पन, भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रभागेच्या वाळवंटातील पुरातन भक्त पुंडलिक यांच्या मंदिरासाठी भक्ताने दिलेला सोन्याचा कळस शुक्रवारी (20 फेब्रुवारी 2026) मंदिराला अर्पन करण्यात आला. यावेळी वारकरी सांप्रदायातील मठाधिपती, महाराज मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे पुंडलिकराज व महादेव देवस्थान विश्वस्तांनी स्वागत केले.

श्री संत गंगुकाका शिरवळीकर यांच्या शिष्य परंपरेतील अकलूज येथील ॲड. अनुजा व डॉ. सुशांत कोकाटे यांनी आपल्या मोतोश्री श्रीमती विजयाताई विजयराव कोकाटे-पाटील यांच्या संकल्पनेतून व ह.भ.प. माणिक महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनात सोहळा साजरा झाला. शुक्रवारी सकाळी सुवर्ण कळसाची मिरवणूक काढण्यात आली. तर ॲड. अनुजा व डॉ. सुशांत कोकाटे यांच्या हस्ते पूजाविधी करण्यात आला. तर ह.भ.प. कदम माऊली यांच्या हस्ते कळशारोहन करण्यात आले. यानंतर ह.भ.प. बाळासाहेब महाराज देहूकर यांचे किर्तन संपन्न झाले. तर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ॲड.माधवीताई निगडे, योगी निरंजननाथ महाराज, ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर, श्री पुंडलिकराज व महादेव देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाबासाहेब अधटराव उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये ह.भ.प. हरि महाराज नामदास, बाळासाहेब महाराज देहूकर, संजय महाराज देहूकर, राणा महाराज वासकर, माधव महाराज शिवणीकर, विष्णु महाराज कबीर यांच्यासह वारकरी संप्रदाय पाईक संघ, श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, विश्व वारकरी संघाचे सदस्य  उपस्थित होते.

Comments are closed.