IND vs SA: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ! अभिषेक, सूर्यासहित राहुलचा रेकॉर्ड केला उध्वस्त
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या (IND vs SA) टी-20 सामन्यात हार्दिक पंड्याने 63 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे टीम इंडियाने 20 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 231 धावांचा डोंगर उभा केला.
हार्दिक पंड्याने (Hardik pandya) अहमदाबादमध्ये खेळताना केवळ 16 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले.
याद्वारे त्याने अभिषेक शर्माचा (Abhishek Sharma) (17 चेंडू) रेकॉर्ड मोडला आणि तो भारतासाठी सर्वात वेगवान टी-20 अर्धशतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत युवराज सिंग (Yuvraj Singh) (12 चेंडू) अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतासाठी टी-20 मध्ये सर्वात वेगवान फिफ्टी:
12 चेंडू: युवराज सिंग (विरुद्ध इंग्लंड, 2007)
16 चेंडू: हार्दिक पंड्या (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2025)
17 चेंडू: अभिषेक शर्मा (विरुद्ध इंग्लंड, 2025)
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. शुबमन गिलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन (27) आणि अभिषेक शर्मा (34) यांनी 63 धावांची चांगली सुरुवात करून दिली. हार्दिकच्या आधी तिलक वर्माने (Tilak Verma) आपला फॉर्म कायम राखत 42 चेंडूंत 73 धावांची तुफानी खेळी केली.
हार्दिकने 25 चेंडूंत 252 च्या स्ट्राइक रेटने 63 धावा चोपल्या. यात त्याने 5 षटकार आणि 5 चौकार मारले. 5 सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. जर आजचा सामना भारताने जिंकला, तर भारत मालिका 3-1 ने खिशात टाकेल. जर दक्षिण आफ्रिका जिंकली, तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल.
Comments are closed.