Pankaja Munde opposition to Valmik Karad after Santosh Deshmukh murder case? PPK


मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत विचारणा करण्यात आली. जेव्हा त्यांनी या प्रकरणी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गावगुंडांकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेला घडून 15 दिवस झालेले असले तरी या प्रकरणातील सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु, या प्रकरणातील प्रमुख आरोपी अशी चर्चा असलेल्या वाल्मीक कराडला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या वाल्मीक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत सलोख्याचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेनंतर मुंडे यांचीही सर्वत्र चर्चा रंगली आहे. परंतु, याबाबत बीडमधील विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मोठे विधान केले आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) कोल्हापुरातून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. (Pankaja Munde opposition to Valmik Karad after Santosh Deshmukh murder case?)

मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत विचारणा करण्यात आली. याबाबत त्या म्हणाल्या की, मी महालक्ष्मी मंदिराच्या पवित्र दारात उभी आहे. त्यामुळे खोटं बोलणार नाही किंवा इतरत्र कुठेही असले तरी खोटं बोलणार नाही. संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी पहिली मागणी कोणी केली असेल तर मी केली होती. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी गोपीनाथ गडावरून ही मागणी मी केली होती. त्यामुळे त्या क्रूर प्रकरणाचा तीव्र संताप आणि निषेध मी व्यक्त केला आहे. पण आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दोन्ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याने ते या प्रकरणात जातीने लक्ष घालून या प्रकरणात न्याय भूमिका घेऊन माझ्या लेकराला न्याय देतील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

– Advertisement –

हेही वाचा… CM Devendra Fadnavis : आरोपीला फाशी होईल सुनिश्चित करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे कल्याण घटनेबाबत पोलीस आयुक्तांना निर्देश

तर, संतोष देशमुख हा माझा बुथ प्रमुख होता. त्याने माझ्यासोबत काम केले आहे. एक चांगला सरपंच म्हणून त्याने काम केले आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या घरच्यांना न्याय देतील, असेही यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रमुख आरोपी अशी चर्चा असलेल्या वाल्मीक कराड याला पंकजा मुंडेंचाही विरोध आहे का? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण हिवाळी अधिवेशनात ज्यावेळी भाजपा आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराड याच्यावर आरोप केले होते. त्यावेळी त्याचे लागेबंध हे मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत असल्याची चर्चा सुरू झाली होती. ज्यामुळे आता पंकजा मुंडे या त्यांच्या भावाच्या सहकाऱ्याच्या म्हणजेच धनंजय मुंडे यांचा सहकारी वाल्मीक कराड याच्याविरोधात आहेत का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे.


Edited By Poonam Khadtale



Source link

Comments are closed.